आज महाराष्ट्रात लाल महालातील पुतळा हलवाण्याच्यावरून जो वाद चालू आहे तो म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही?यावरून वाद घालण्यापेक्षा आज जे आहे ते टिकवता कसे येईल त्यावर लक्ष्य केंद्रित करावे.३५० वर्षापूर्वीचे महाल,किल्ले,महाराजांच्या काळातील बांधकाम हे सर्व त्याकाळातील स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे.परंतु आज यांची स्थिती चांगली नाही.रायगड,सिंधुदुर्ग,इत्यादी ठिकाणी बांधकाम ठासळत आहे.प्रशासन किंवा पुरातत्व विभाग त्याच्याकडे पुरेसे लक्ष घालत नाही.त्यासारख्या गोष्टींकडे संबंधितांचे कडून काम करून घेणे आणि आपला समृद्ध इतिहास जतन करणे सोडून मतिमंदासारखे वाद करणे बरोबर नाही.परदेशात इतिहास कालीन वास्तू जतन करणे, त्या सुस्थितीत ठेवणे महत्त्वाचे समजतात.आपण सुद्धा आपल्या कडील महाल,किल्ले इत्यादींचे जतन करणे आवश्यक आहे.त्यांच्या भोवती बाग-बगिच्या करणे,सबंधित वास्तूच्या बद्दल माहिती (इतिहास) दर्शवणे,वास्तुची पडझड झाल्यास त्याची डागडुजी करणे,इत्यादी कामे करणे आवश्यक आहे.यांसाठी प्रशासनावर दबाव आणून,प्रसंगी राडाबाजी करून हि कामे पूर्ण कशी होतील यांकडे लक्ष द्यावे.आपली ताकद असल्यागोष्टींसाठी खर्च करावी.फुकट गोष्टींवरून वाद करण्यापेक्षा महाराजांच्या वास्तुंचे,त्यांच्या इतिहासाचे,त्यांच्या पराक्रमाचे जतन करणे चांगले ठरेल.आज सर्व किल्ले हे सरकारच्या ताब्यात आहेत.त्यामुळे वरील गोष्टी होत नसतील तर सरकारला त्या बद्दल कृती करण्यास भाग पाडावे.परदेशात यांबद्दल खूप दक्षता गेतली जाते.परदेशी गेल्यावर आपण नुसते म्हणतो कि काय तो फोर्ट होताना,खूप सुंदर!!! कुठे घाण नाही कि काही नाही.सगळे कसे सुंदर,नीटनेटके.आपण सुद्धा असे करू शकतो.पण त्यासाठी हवी ती अक्कल,जी आज आपल्याकडे नाही.महाराजांचे गुरु कोण होते या पेक्षा महाराजांचा पराक्रम आठवावा.त्यांच्या इतिहासाचे,वास्तूंचे जतन करावे हीच खरी त्यांची सेवा !!!!
पुतळा
Submitted by एके-४७ on 1 January, 2011 - 04:00
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अगदी खरे आहे
अगदी खरे आहे
अरे हे शिवजी महाराजाचा पुतला
अरे हे शिवजी महाराजाचा पुतला सुध्दा हलवतिल.
किल्ले खुप लाब आहेत.
शेवति सगले रजकारन ............................
गोब्राह्मणप्रतिपालक
गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपतींना किती यातना झाल्या असतील, देव जाणे. ज्या महाराजांनी कधिच जात मानली नाही, त्यांच्यावरुन आज जातीचा राजकाण करतायत हि लोकं.....