हे राम!
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी "हे राम!" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब!) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला?
विषय:
प्रकार:
शेअर करा