चेहर्यावरचं सहज निर्व्याज हसू
कृत्रिम होऊन स्मायली झालं
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही
संभाषणात अट्टाहासाने पेरलेले स्मायली
स्वल्पविरामांची जागा घेतल्यासारखे पसरले
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही
मग वास्तवातल्या मुखवट्यांवरही मात करण्यापर्यंत
याच स्मायलींची मजल गेली
तेव्हाच मी ओळखलं
आता खरंच काही खरं नाही
--------------------------------
२९.१२.२०१३
मार्गशीर्ष कृ. १२, भागवत एकादशी, शके १९३५
माझी कविता वाचलीत
आभार तुमचे मानतो
काय हवे तुम्हांकडून
विनम्रतेने सांगतो:
*
दो लब्ज प्यारके
दो लब्ज यारके
*
दोन शब्द टोचणारे
द्व्यर्थाने बोचणारे
*
तिरके आणि झोंबणारे
भावनिक ओथंबणारे
*
कडकडून डसणारे
वर्मावर बसणारे
*
भांडणे उकरणारे
लाथेने ठोकरणारे
*
स्वत:कडे नसतील तर
बाजारात मिळणारे
*
विकत नाही मिळाले तर
रेन्ट ऑर लीज
पण माझ्या मित्रांनो
स्मायली नकोत प्लीज !!!!
दोस्तांन्नो ,
बर्याचदा गप्पांच्या धाग्यांवर गप्पा मारताना कोणीतरी मस्त स्मायलीज टाकतं ...खुपच बोलक्या स्मायली ...अर्थात गुगलुन असल्या सगळ्या स्मायलीज सापडतीलच पण गप्पा मारताना कुठं सारखं गुगलत बसा ...त्यापेक्षा आपल्च एक स्मायली कलेक्षन असलं तर
तर इथे तुमच्या आवडत्या सामयलीज टाका ...आणि त्यांचे कोडही टाका