वडील

वडील

Submitted by वृन्दा१ on 27 June, 2017 - 14:38

जेंव्हा लहानपणीच्या ओळखीचा राक्षस आभाळात गडाबडा लोळतो
नुसताच गडगडाट, नुसतीच हूल
न संपणारी प्रतीक्षा आणि फसवी चाहूल
आतला पाऊस आत आणि वरचा वर गोठलेलाच राहतो
तेंव्हा तुमची आठवण येते......

विषय: 
शब्दखुणा: 

वडील

Submitted by वृन्दा१ on 17 June, 2017 - 13:49

कसेही कशानेही होत नाही मनाचे समाधान
झाड उन्मळून जाता वाऱ्यावर हताश पान
कसला पुनर्जन्म आणि कसली पुन्हा भेट
आता हृदयाचा हृदयाशी संवाद होईल थेट

विषय: 
शब्दखुणा: 

वडील

Submitted by वृन्दा१ on 23 March, 2017 - 11:50

शब्दांचा कल्पवृक्ष
तुम्ही माझ्यासाठी लावलाय
त्यातून आता फक्त अश्रूच झरतात
त्याच जुन्या जखमा
आत खोलवर चरतात

विषय: 
शब्दखुणा: 

वडील

Submitted by वृन्दा१ on 3 March, 2017 - 14:56

पोहायला शिकवलंत सराईतपणे
पाण्यात श्वास रोखणं जमलं
आता पाण्यात नसताना श्वास कोंडतो
मग काय करायचं
ते मात्र शिकवायचं राहिलं

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वडील