विसावा
कोकणात खाडीच्या कांठी वाळूच्या टेकाडांच्या आडोश्याला विसावणार्या दिसतात अशा होड्या -
कोकणात खाडीच्या कांठी वाळूच्या टेकाडांच्या आडोश्याला विसावणार्या दिसतात अशा होड्या -
"पेंट"मधें केलेलं कोंकणाच्या किनारपट्टीवर दिसणारं एक विहंगम दृश्य-
एकदा यु-ट्यूब वर डिजिटल पेंटिंग सर्च करत होतो अन त्या कश्या बनवतात तेही पाहिलं आणि माझ्यातला हौशी कलाकार पुन्हा एकदा जागा झाला काहीतरी नवीन करून पाहायला आणि पडलो सुरु अन अनपेक्षितच माझ्या मनातल्या या दोन कलाकृती photoshop मध्ये अवतरल्या !कश्या वाटल्या जरूर कळावा?
©
नविन वर्ष आले....
काही नविन आव्हान तर...काही जबाबदारी घेऊन आले....
काही चिन्ता... आणि...खुप खुप आनन्द घेऊन आले....
सर्वा॑चे स्वागत आपण फार उत्साहाने, जोशाने केले...
त्यातलेच काही आनन्दाचे क्षण मी Photoshop मध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे...
!!!धन्यवाद!!!
एक प्रयत्न....काही आठवणी....
Photoshop च्या माध्यमाने....
आल्या रेखाटूनी....
पूर्वी पण टाकला होता तो परत टाकतेय.
हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
या सदरातल्या माझ्या "कोंकण"ला मिळालेला प्रतिसाद पाहून कांहीशा आधाशीपणेच हे "पेंट"मध्येच केलेलं दुसरं चित्र टाकतोय. जाणकारांकडून आता मात्र मला कानपिचकी "ओव्हरड्यू" आहे !
अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन.