फोटोशॉपची करामत
आईबाबांचा ५५ वर्षांपूर्वीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो फोटोशॉपमधून रंगीत केला
आईबाबांचा ५५ वर्षांपूर्वीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो फोटोशॉपमधून रंगीत केला
कोंकण म्हटलं कीं समुद्रकिनारा, नद्या, नारळी-पोफळीच्या बागा व मंदिरं इ. नजरेसमोर येतात. पण बरचसं कोंकण अगदीं जगाआड डोंगरदर्यातही वसलेलं आहे, हे लक्षात येत नाही. अगदी छोटी गावं, वाड्या व एकांडी खोपटं, घरं मुख्य रस्त्यांपासून दूर डोंगरांच्या कुशीत, सखल, चिंचोळ्या दर्यांत दडलेली असतात. दिवसात एस.टी.ची एखाद-दुसरी फेरी, एव्हढीच बाहेरच्या जगाशी त्यांची तोंडओळख असते. खूप प्रयत्न करूनही मला तिथली गूढता, एकाकीपणा नेमका नाही चित्रित करता आला. पण त्याची कांहीशी कल्पना तरी यावी म्हणून हे चित्र धीर करून पोस्ट करतो आहे.
यात्रेत फिरत असतांना मी "रुबीक क्युब" पाहिला आणि तो विकत घेतला . रंग जुळवत असतांना मी सह्जच भारताचा झेंडा बनवण्याचा प्रयत्न केला . आणि तो बनला देखील , मग लगेच हातात कॅमेरा घेतला अन कामाला लागलो . कारखान्यात अनेक प्रक्रियांनंतर जशी वस्तु बनते तशी माझ्या डोकयातल्या कारखान्यात तयार झालेली ही "देशी" कलाकृती. कशी वाटली जरुर कळवा.
PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय
माझ्या मनातली बाग
हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले आहे.
खरं तर एक फोटो बघितला एका बागेचा; अगदी माझ्या मनातल्या बागेसारखा, तो फोटो बघून बघून हे संपूर्ण चित्र फोटोशॉपमध्ये रंगवले. खाली मूळ फोटो.
काढलेले चित्र :
मूळ फोटो :