डिजिटल आर्ट

पाणंद

Submitted by भाऊ नमसकर on 1 February, 2011 - 04:11

घरापासून विहीरीकडे जाणारी वाट साधारणपणे "पाणंद " म्हणून ओळखली जाते. पण सिंधुदूर्गात दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद [ खरं तर "पानन" म्हटलं जातं ]. माझ्या आठवणीत दडलेली अशीच एक लोभस पानन चित्रित करावी असं खूप वाटायचं.
मायबोलीवर रंगीत चित्रांसाठी मला कांही चांगलीं सॉफ्टवेअर सुचवली गेली. पण ती आत्मसात करायला मला कांही वेळ लागणारच [Very slow on uptake !]. म्हणून आपल्या सरावाच्या व आवडीच्या "पेंट"मधे रंगीत पानन कितपत जमते तें तर पाहूं, असा हा प्रयत्न - paayavaaTa.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नदीकांठ- २

Submitted by भाऊ नमसकर on 27 January, 2011 - 10:05

कोंकणात रात्री नदीकांठी जाऊन निवांत बसणे याचा आनंदच आगळा. ते वातावरण चित्रित करण्याचा प्रयत्न करावा असं खूप वाटायचं पण धीर होत नव्हता. मायबोलीवरच्या प्रतिसादाने तो धीर आला पण ते वातावरण चित्रात कितपत आलं याबद्दल मींच साशंक आहे. तांत्रिक बाजूची बोंब तर आहेच ! [ हेंही "पेंट"मधेच माऊस वापरून केले आहे ]
night2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मॅट पेंटिंग

Submitted by मुरारी on 19 January, 2011 - 22:46

आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता.
बर्याच इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात

मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता

मी पण एक प्रयत्न केलेला होता
एक झलक पेश करतोय

अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस

मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - डिजिटल आर्ट