डिजिटल आर्ट
कभी कभी ...मा़झ्या आवाजात - Kiran
( व्हिडिओ थोडासा बदलून अपलोड केला आहे. आधी फक्त आवाज होता, त्याला ऑर्केस्ट्रेशनची जोड दिली आहे. )
मला फक्त माझा आवाज मा़झ्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचावा ही इच्छा होती.. म्हणून कभी कभी मेरे दिल में ही साहीरची कविता रेकॉर्ड करून तिचा व्हिडिओ बनवला. एक हौस म्हणून आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून...
हौशी प्रयत्न आहे. सांभाळून घ्यालच
एकटी तु सागरात, नसे एकटा मी नभात
Kelshi
माझी खिडकी
कोकण - व्हाळ [ ओहोळ, नाला]
'व्हाळ' शब्द बहुधा 'ओहोळ' वरून आला असावा. कोकणात बहुतेक गांवांत फिरताना व्हाळाची खळखळ कुठून तरी तुम्हाला साद घालत रहातेच. तुमचे कान तयार असतील तर व्हाळाच्या कोणत्या टप्प्यानजीक तुम्ही आहात, हेंही तुम्ही नेमकं हेराल; डोगराच्या उतारावरून कोसळणारा व्हाळ धबधब्यासारखा अविश्रांत कानावर धडकाच देत असतो, तिथून बागायतीत शिरला कीं जरा विसावून , सुखावून त्याचं लयबद्ध, हंळुवार खळखळणं तो सुरूं करतो ; तिथंही नधेच कुठं गर्द झाडीतून जाताना धसकावून, श्वास कोंडून ठेवल्यासारखा चोरपावलानी तो ती जागा पार करतो.
कोकण : तर [ Ferry service ]
आता कोकणात सर्वत्र पूल व्हायला लागलेत; ऐलतीर व पैलतीर याची गंमत तडीपार होतेय. तरीची होडी आता मासेमारी करूं लागलीय. माडांच्या बागेतून मुरडत, बागडत तरीकडे धावणारी पायवाट पूलाकडे जाणार्या डांबरी रस्त्याला बुजून अंगावर गवत पांघरून दडत्येय. आठवडा बाजाराच्या दिवशी डोक्यावर टोपल्या घेऊन तरीची आधीची फेरी पकडायला तुरुतुरु धावणार्या बाजारकरणी आता टायमातली येस्टी पकडायला स्टॉपवर ठाण मारतायत. एक वेळ गावच्या इथ्यंभूत माहितीचा संदर्भग्रंथ असणारी व पिढ्यानपिढ्या दिवसरात्र तत्परतेने सेवा देणारी नदीकांठची तरवाली कुटूंबं आपली ओळखच गमावून बसलीयत.
माझ्या मनातला चंद्र.....
गेट अॅन आयडीया !
लोकांनो नसत्या उठाठेवीसाठी बर्याच आयडीया आपल्या सुपीक डोक्यात येत असतात. मग काय सगळेच जेम्स बाँड इथून तिथून मिथून सारखे ह्याच्या त्याच्या विपुमधून फिरत असतात. बस झालं आता ते सगळं ..
मग काय सुचतंय का?
बाल शिवबा
Pages
