जगाआड

Submitted by भाऊ नमसकर on 16 February, 2011 - 12:26

कोंकण म्हटलं कीं समुद्रकिनारा, नद्या, नारळी-पोफळीच्या बागा व मंदिरं इ. नजरेसमोर येतात. पण बरचसं कोंकण अगदीं जगाआड डोंगरदर्‍यातही वसलेलं आहे, हे लक्षात येत नाही. अगदी छोटी गावं, वाड्या व एकांडी खोपटं, घरं मुख्य रस्त्यांपासून दूर डोंगरांच्या कुशीत, सखल, चिंचोळ्या दर्‍यांत दडलेली असतात. दिवसात एस.टी.ची एखाद-दुसरी फेरी, एव्हढीच बाहेरच्या जगाशी त्यांची तोंडओळख असते. खूप प्रयत्न करूनही मला तिथली गूढता, एकाकीपणा नेमका नाही चित्रित करता आला. पण त्याची कांहीशी कल्पना तरी यावी म्हणून हे चित्र धीर करून पोस्ट करतो आहे.

lonely 2.JPG

गुलमोहर: 

मस्तच..
ते एक छोट मंदिर आहे ना चित्रामध्ये ..
अन त्या डोंगरावरती छोटी छोटी घर सुद्धा झकास आली आहेत.
वळणावळणाचा रस्ता पण मस्त आलाय.

छान जमलंय हे ही.

गूढतेकरता समजा रात्रीचं दृष्य दाखवलं असतंत तर? मिट्ट काळोख त्यात एखादाच मिणमिणता दिवा, आजूबाजूला गच्च झाडांची गर्दी वगैरे.

भाऊ, सुरेखच हो. अशी काही गावे आठवली पण.
तूम्ही पिकासा अकाउंट उघडा बरं. अशी चित्र मोठ्या आकारात पाहिजेत.
इथे मदतपुस्तिकेत सविस्तर माहिती आहे. काही अडचण आल्यास, आमच्यापैकी कुणालाही सांगा.

भाऊ इज बॅक !! Proud तरीच म्हणा व्हतय कोकणची अजून एक डिजीटल आवृत्ती भाऊंकडून कशी येउक नाय.. Happy

कठीणात कठीण वाटणारे चित्र काढण्यात तुमचा हातखंडा आहे... खूपच सुंदर रेखाटले आहे !

मी हे चित्र जरा धीर करूनच पोस्ट केलं होतं. प्रतिसादात आपुलकीचाच वाटा जास्त आहे ,हे जाणून आहे.
<<तूम्ही पिकासा अकाउंट उघडा बरं.>> दिनेशदा तो अकाऊंट आहे पण त्याचा उत्तम उपयोग इथं होईल, हे समजण्याची कुवत हवी ना ! म्हणून तर मानतो मा.बो.वरच्या तुमच्यासारख्याना !! पुढचं चित्र नक्कीच तसं. धन्यवाद.
<<कठीणात कठीण वाटणारे चित्र काढण्यात तुमचा हातखंडा आहे...>> यो रॉक्स, सोप्यां काढूंक गेलंय, लोक म्हणतले, " ह्यांय कांढूक जमणां नाय, तर ख्येंकां मिरवूंक बघताहा !". त्यापेक्षां, डेअरिंग करून कठीणाकच हात घातलो, तर लोक म्हणतत, " शिकाऊ असान काय अगदीच वायट नाय काढणां !". कळलां ? मालवणी आसास म्हणानच ही अंदरकी बात तुमकां म्हणान सांगलंय ! Wink

कळलां ? मालवणी आसास म्हणानच ही अंदरकी बात तुमकां म्हणान सांगलंय ! >> Lol पण कायव म्हणा माका तुमची ही कला ग्रेट वाटते.. एका पेक्षा एक चित्र काढलेली आसत तुम्ही.. !

भाऊ, पोर्ट्रेट पण बघायचेय, तूमच्या हातचे. तूमचे डिटेलींग एवढे सुंदर असते ना, कि चेहर्‍यावरची रेघ नि रेघ बोलकी कराल.