लेखनसुविधा

तडका - "देवा"च्या नावाखाली

Submitted by vishal maske on 30 November, 2015 - 08:54

देवाच्या नावाखाली

देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात

माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात

चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सल्ले

Submitted by vishal maske on 29 November, 2015 - 21:25

सल्ले

कधी फूकटचे असतात
कधी विकतचे असतात
असे एकमेकांना सल्ले
अगदी निकटचे असतात

कधी सल्ले महत्वाचे
कधी कल्ले असतात
तर कधी सल्ल्या मार्फत
घमासान हल्ले असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऑनलाइन

Submitted by vishal maske on 29 November, 2015 - 09:03

ऑनलाइन

नव-नवे माणसं,
नव-नव्या ओळखी
नव-नव्या गप्पांची
रोज नवी पालखी

सोशियल मिडीयावर
इन करून साइन
भेटू लागले रोज
माणसं ऑनलाइन

रोज होतात भेटी
रोज होतं बोलणं
तरी देखील कठीण
दुराव्याला झेलणं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

ऊठ बाई तु जागी हो,...

Submitted by vishal maske on 28 November, 2015 - 23:20

~!!! उठ बाई तु जागी हो,... !!!~

का वैचारिक प्रगतीची
अजुनही दिरंगाई आहेस
समाजही सांगतो आहे
की बाई तु बाई आहेस

बाईला समानता देणं
गलिच्छ मानलं जातंय
तुझं बाई पण आजही
का तुच्छ मानलं जातंय

का बाईकडे पाहताना
समाज झालाय आंधळा
बाईविना खरं तर हा
समाज होईल पांगळा

आजही नाकारलं जातं
बाई तुझ्या स्वातंत्र्याला
आजही बंदी आहे तुझ्या
त्या मंदीरातील प्रवेशाला

घरा-घरात बसली आहेस
थोडसं बाहेर येऊन बघ
प्रश्न आहे तुझ्या हक्काचा
सावित्रीची लेक होऊन जग

बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्‍यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो

विशाल मस्के

तडका - प्रिय प्रवाशांनो

Submitted by vishal maske on 28 November, 2015 - 21:08

प्रिय प्रवाशांनो

प्रवासातील सुरक्षेकडे
लक्षपुर्वक लक्ष द्यावे
स्वत:च्या काळजीसह
इतरांसाठी दक्ष रहावे

कितीही घाई असली तरी
नियम तोडून जाऊ नये
जीवन अनमोल देण आहे
जीवनाला चुना लावु नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मंत्रीमंडळ विस्तारात

Submitted by vishal maske on 28 November, 2015 - 08:49

मंत्रीमंडळ विस्तारात

कुणाला भलतं महाग जातं
तर कुणाला पडतं सस्त्यात
कुणा-कुणाची वर्णी लागणार
सारं गुपितही गुलदस्त्यात

ज्यांची वर्णी लागेल त्यांचा
भविष्यकाळ हसु शकतो
तर मंत्रीमंडळ विस्ताराचा
कुणाला झटका बसु शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले

Submitted by vishal maske on 27 November, 2015 - 21:54

क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले

स्री-पुरूष समानतेचे
आज येऊ लागले नारे
नारींच्याही यशकिर्तीचे
आता वाहू लागले वारे

स्री शिक्षणाला जागृत झाला
हा समाज तुमच्या मुळे
आजही तुम्हा नमन करतो
क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जेल पार्टी

Submitted by vishal maske on 27 November, 2015 - 09:35

जेल पार्टी

मोबाइल चा वेगळा दर
चार्जिंगचा वेगळा दर
गांज्या आणि पार्टीसाठी
ठरलेला वेगळा दर

वेळो-वेळी लक्षपुर्वक
कैद्यांची उठाठेव होती आहे
कळंबा जेलची अशी
दुर-दुरवर ख्याती आहे

हॉटेल सारखेच जेल देखील
स्टार वाले ठरू लागतील
"जेल-पार्टी" करण्यासाठी
लोक गुन्हेही करू लागतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

* सदरील वात्रटिका ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

तडका - खरा दोष

Submitted by vishal maske on 26 November, 2015 - 21:44

खरा दोष

डान्स-बार बंदी उठल्याने
कुणी सुखावले-कुणी दुखावले
डान्स बारकडे वळतील म्हणे
इथले कित्तेक रंगेल पावले

कित्तेकांच्या बरबादीचाही
डान्स-बार वर रोश असतो
मात्र तो डान्स-बारचा नाही
तिथे जाणारांचा दोष असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गती

Submitted by vishal maske on 26 November, 2015 - 10:02

गती

त्यांनी छो म्हणताच
कित्तेक धावले जातात
त्यांनी "हो" म्हणताच
ब्रेकही लावले जातात

मात्र छो-हो म्हणायला
इथे विशेष निती असते
दुसर्‍यांच्याच इशार्‍यावर
कित्तेकांची गती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा