सागरतीरी..
तो लाल केशरी गोळा
बुडे जळी हळूवार..
अन् क्षितीजावरती रंग
पसरी काळाशार..!!
ती तांबड-लाली विरता
तम कणाकणाने दाटे..
सभोवार मग अवघा
तिमिराकृतीत गोठे..!!
दूर किनारी पुढे
खडकांवर लाटा फुटती..
पाण्यात उभे केलेले
मचवे शिडांसह डुलती..!!
चंद्रमा उगवता नभी
मेघकडा रुपेरी होती..
अन् डचमळणाऱ्या लाटा
चांदीचा वर्ख मिरविती..!!
रात्र गडद होताना
कोलाहल हळूहळू विरतो..
वाळूत सैल पसरता
एकांत मनात झिरपतो..!!
एक उनाड आणि भरगच्च दिवस @ काळा घोडा महोत्सव..
मुखपृष्ठ… (काळा घोडा परिसराचा त्रिमितीय नकाशा..)

कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
तेच दृश्य त्याला वारंवार दिसत होतं.
गरगरणाऱ्या आकाश-पाळण्यासारख्या भोवळ आणणाऱ्या गतीने तर कधी संथ.
सभोवताल वारंवार बदलत होता आणि त्याचा देहही.
कोणकोण आणि कायकाय होता तो, कोण जाणे.
मानव, पशु, पक्षी.. अगदी पिशाच्चयोनीही.
त्यातही सलणारी बाब म्हणजे परिसरातले भोचक लोक वारंवार डोकावून उघडपणे टिकाटिप्पणी करत होते.