हा दोष कुणाचा
हा दोष कुणाचा
माझ्यामधील संस्कारांचा कि
कायद्याला भिऊन रहा या शिकवणीचा,
माझ्यातील हळवेपणाचा कि
चाकोरीबाहेर पाउल न टाकणार्या भित्रेपणाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यामधील मस्तीचा कि
मन मानेल तसे वागणार या बेदरकारपणाचा,
तुझ्यातील उन्मत्तपणाचा कि
चाकोरीबाहेरचे जीवन जगणार्या जोषाचा,
हा दोष कुणाचा
माझ्यामधील अवयवांचा कि
सहन करु शकले नाहीत आक्रोश वेदनांचा,
माझ्या डोक्यातील विचारांचा कि
स्तब्धच झाले अर्थ न जाणवे यातनांचा
हा दोष कुणाचा
माझ्यामधील सुरिक्षत कारचालकाचा कि
नियम पाळून दुखावल्या गेलेल्या मनाचा,
हा दोष कुणाचा
तुझ्यातील बेफाम वेगाचा कि
अपघात करूनही शीळ वाजिवणार्या तारुण्याचा