जीवन हे असेच असते

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 6 October, 2010 - 13:38

माणूस स्वतःसाठी कधी जगतच नसतो
त्याला जगावे लागते मनाची कवाडं बंद करून,

खोटे चेहरे लावावे लागतात
मुखवट्यावर मुखवटे चढ्वावे लागतात

मनात कढ असले तरी
ओठावर हसू दाखवाव लागतं,

मनातली वेदना दाबून ठेऊन
डोळ्यात आनंद दाखवावा लागतो,

मनांत खळबळ चालू असते
पण चेहरा शांत ठेवावा लागतो,

कधि मन खुप उदास असतं
पण हास्याची कारंजी उडवावी लागतात
उसना उत्साह दाखवावा लागतो

मनांत द्वेष असला तरी
चेहय्रावर प्रेम दाखवावं लागतं

जीवन हे असेच असते
खोट्या मुखवट्यांचे,

मनाची कवाडं कधि उघडताच येत नाहीत
पण जेंव्हा कधि मुखवटा गळून पडतो
तेंव्हा मात्र मनाची दारं उघडतात

अन मग दिसते
रक्तरंजित मन
मारून मारून घायाळ झालेले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: