सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...
रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...
-- इतरत्र पूर्वप्रकाशित
सांगतो एका राजाची गोष्ट :
कोण्या काळी कोण्या देशी
होता एक राजा महान
होती त्याची पत्नी बहुगुणी आणि छान
राजा होता खूप शूर
करे तो शिकार जाऊन दूर
पराक्रमाच्या त्याच्या अख्याईका
पसरल्या होत्या भरपूर
राणी होती देवाची भक्त
करे सतत उपवास
व्हावे राजाने मोट्ठे
म्हणून तिचा असे प्रयास
प्रेम होते राजाचे
आपुल्या राणी वरी अतुल्य
राणी चाही राजा वर
विश्वास असे बहुमूल्य
सारे काही सुरळीत
राज्य चालले असताना
येते एक सुंदर यक्षीण
कधी राजाच्या स्वप्नाला
होतो राजा विलक्षण मोहित
यक्षिणी च्या सौंदर्याने
त्याचे चित्त उडते सारे
भारावतो तिच्या प्रेमाने
यक्षीण म्हणते राजाला
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते:
">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया"
मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
म्या जवा भेटाया जातो काशीला....
तवा... तवा...