कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

Submitted by पाषाणभेद on 27 August, 2010 - 22:21

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते:
">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया"

मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
म्या जवा भेटाया जातो काशीला....
तवा... तवा...
तवा निसती ताठ करी मिसूरडं ||धृ||

हातात काठी अंगात डगला
दारापाशी तो राखणदार बसला
येळ काढ थोडा उगा नग रडारड
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||१||

तुझी अन माझी जोडी जमली
नाही कोनीही भिती घातली
मग तुझाच बाप का घाली खोडं?
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||२||

न्हाई भित मी तुझ्या बा ला
वर्‍हाड घेवून येईल सांग त्याला
जावई आहे त्याचा मी मागंपुढं
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०८/२०१०

गुलमोहर: 

मित्रा..
तुला घर कशाला पाहिजे.?
माझ्या मनात तुला घर दिलंय
नि ते तर कधीच जुने होणार नाही .??
अन नाशिकची हवा तर मस्त
गाभूळलेल्या चीचेसारखी

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड.
छान .सुंदर!!!

छान !
[कांही वर्षांपूर्वी पुण्याच्या मित्राला चिमटा काढायला एक व्यंगचित्र पाठवलं होतं, त्याची आठवण झाली व तें "सेव्ह" केलेलं सापडलंही ] -
kothrud.JPG

कोथरूड हे एका गावाचे नाव आहे ना?

कोथरूड या नावावरून थोर बालशिक्षातज्ज्ञ अनुताई वाघ यांचे नाव आठवले.

<<कोथरूड हे एका गावाचे नाव आहे ना? >>गावाचं नाव होतं. पण ते गाव आता पुणे शहराचाच एक महत्वाचा भाग झाला आहे.

माफ करावे.

थोर बालशिक्षातज्ज्ञ अनुताई वाघ यांचे कार्यक्षेत्र कोथरूड नसून कोसबाड टेकडी असे आहे.

भाउ साहेब. आम्ही कोथ्ररूड्चे बर का सद्ध्या. आस्पास दिसलात तर बाउन्सर नाहीतर गूगलीने स्वागत करीन.
आणि कुठल्याही काशीचा बाप नसलो तरी पाषाण्भेदाचा मस्तक भेद करीन.

विक्रमजी, मीही असतो कोथरूडला अधून मधून; आता हेल्मेट घालून फिरेन एव्हढंच ! [ पण विक्रमजी, खरं तर कोथरुडलाच असं वेगळं काढून "रूड" म्हटल्याच्या अन्यायाविरुद्धच तर मी आवाज उठवलाय !]