उजेड

शुभं करोती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 October, 2019 - 01:01

शुभं करोती

दिव्या दिव्या दीपत्कार
मनात घडव चमत्कार

जावो दैन्य अंधःकार
उजेड पसरो सभोवार

स्वार्थ निपटून भारंभार
मनात जागो परोपकार

अज्ञान पूर्ण दूर सार
ज्ञान सागर हेचि सार

उजेड

Submitted by नीधप on 13 March, 2019 - 10:56

भरपूर उजेड आहे इथे.

इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?

हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?

की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात

तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.

तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.

हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.

- नी

(लिखाणातून)

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उजेड