Submitted by नीधप on 13 March, 2019 - 10:56
भरपूर उजेड आहे इथे.
इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?
हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?
की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात
तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.
हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.
- नी
(लिखाणातून)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय >>> वाह... ही स्थिती किती परीचीत ... मन नुस्त्या विचराने घाबर घाबर झालं
Khup chan.Aawadali.
Khup chan.Aawadali.
मस्तच!
मस्तच!
थँक्स
थँक्स
घुसमट छान चितारली आहे , मस्त
घुसमट छान चितारली आहे , मस्त