माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मी विणलेला हा लोकरीचा jumper suit.
बाळ झाल्यावर हाताने तिची उंची, जाडी मोजून स्वेटर बनवले. तशीच तिच्या डोक्याची, पायाची मापे पाहून त्यानुसार सशाची टोपी आणि लोकरीचे बूट बनवले. स्वयमला शाळेत लेस चे बूट असल्याने त्याने तसेच बूट बनवण्याचा आग्रह केला. त्यामुळे लेस चे बूट बनवले.


तिलुने पर्स check करायला सुरुवात केली.
'काय झालं?', Stan ने काळजीच्या स्वरात विचारलं.
तिलु तशीच चालु पडणार तोच Stan आडवा आला.
'का?'
'पैसे गायब आहेत यातले'
तिलु एक एक शब्द शांत पण जरा चढ्या आवाजात म्हणाली.
तिलुने निघत असताना नेहमीप्रमाणेच ड्रावरमधून नोटा पर्स मध्ये कोंबल्या होत्या. Dennis मध्ये बिलाची रक्कम भरतांना तिला नेहमीची 100 ची नोट दिसली नव्हती. कदाचित तिच्या वेंधळेपणामुळे कुठे राहिली असेल असं आधी वाटलं. पण आता संशय घ्यायला जागा होती.
'ओह नो! विसरला का कुठे?', Stan ने विचारलं.
Holiday inn च्या वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये उभी होती ती. एकटीच. वार्याची झुळूक आली की नाही असं वाटलं म्हणून खिडकीत उभी राहिली. रस्ता संथ वाहत होता. 'ऑफिसला जाणार्यांची वर्दळ', ती पुटपुटली.