व्हिएतनाम
व्हिएतनाम - देश फुलांचा!
खरं म्हणजे अमेरिकन संस्कृतीमध्ये काही वर्षं घालवलेली असल्याने व्हिएतनाम म्हटलं, की युद्धाचीच आठवण होते. माझ्या एका प्राध्यापकांना युद्धविरोधी निदर्शनांत अटक झाली होती म्हणूनही असेल. खरंतर इतक्या सुंदर देशाबद्दल विचार करताना युद्धाची आठवण येणे ह्यासारखा दैवदुर्विलास वगैरे नाही. मी पोचलो, तो नववर्षस्वागताचा आठवडा. 'टेट' हा इथला वसंतागमनाचा सोहळा. आपल्या चैत्रासारखा. बर्याच पूर्व आशियाई देशांत हा वसंतागमनाचा सोहळा चांद्र नववर्षानुसार जानेवारी/फेब्रुवारीमध्ये असतो. चिनी ल्युनार न्यू यिअर वगैरेची कल्पना होती. तसा इथे हा टेट. पण 'हॅपी टेट' वगैरे म्हणत नाहीत.
व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ४(क्रमशः)
आज सकाळी मृणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्या.
व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग 1
सगळ्यांच्या बकेटलिस्ट(आजकाल हा शब्द जास्तच लोकप्रिय झाला आहे)मधली बरीचशी ठिकाणे आमची पण बघून झाली असल्यामुळे आता परदेश प्रवास नको ग बाई(६५ प्लस चा परिणाम असावा)ह्या निष्कर्षाप्रत मी आले होते.नको तो१७,१८ तासांचा प्रवास, एअरपोर्ट वर ७,८ तास ताटकळत बसणे, जाणारी,येणारी विमाने न्याहाळणे, आपल्या पर्सला किंमती झेपणार नाही हे माहीत असून ड्युटी फ्री दुकानातून उगीचच फेरफटका मारणे इत्यादी गोष्टींचा आता कंटाळा यायला लागला.बरे, परदेशात विमाने संध्याकाळी ७,८पर्यंत पोचतात किंवा निघतात.