१. गोल राईस पेपर: कुठल्याही एशिअन स्टोअर/ ग्रोसरी स्टोर मध्ये एशिअन पदार्थ मिळतात त्या रांगेत सहज मिळेल. भारतातही मिळावा. (पांढरा रंग)
२. आवडीच्या भाज्या बारिक लांब काप करुन. यात क्रंची भाज्या छान लागतात. मी आज करताना काकडी, गाजर, कोबी आणि रंगीत सिमला मिरची आणि अॅवकाडो काप करुन घेतले आहेत. यात आवडी प्रमाणे पुदिना, कोथिंबिर, बेझल ची पाने चिरुन छान स्वाद येतो. क्रंची सॅलडचं एक पानही छान लागतं. स्प्रिंग मिक्स असेल तर ते ही घालू शकता. (हिरवा आणि केशरी रंग)
३. राईस नूडल्स (आज घरात न्हवते त्यामुळे वगळले आहेत. घाला नका घालू फार फरक पडत नाही. )
पीनट डिप करिता:
पीनट बटर ३-४ टेबल स्पून
पांढरं व्हिनेगर : १ टे. स्पू.
अर्ध्या लिंबाचा रस
सोय सॉस: १.५ टेबल स्पून
तीळ : १ टी स्पून
साखरः १.५ टे स्पून.
थोडं आलं किसून
मीठ : हवं असेल तर. सोय सॉस मध्ये असतं, त्यामुळे घातलंत तर जपुन.
चिली ऑईलः १ टे. स्पून
थोडं फ्लेवर साठी हवं असेल तर ऑलिव्ह ऑईल.
फिश सॉसः आवडत असेल, घरात असेल तर. स्किप करू शकता. मी घातलेला नाही.
नारळाचं दूधः १ टे स्पून. हे ही मी आज घातलेलं नाही. घातलं तर रंग जरा उजळतो आणि क्रिमी टेक्श्चर येतं.
१. पीनट डिप मधले सगळे जिन्नस एक मोठ्या मायक्रोवेव्ह सेफ बोल मध्ये एकत्र करा. पीनट बटर किंचित मऊ व्ह्यायला १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह करा. डिप म्हणून घट्ट वाटलं तर चार थेंब पाणी घालून सगळं एकत्र करुन घ्या. स्प्रिंग रोल्स मधली सगळी मजा या डिप मध्येच आहे. त्यामुळे हे डिप चांगलं तिखट, गोड, आंबट, क्रिमी लागलं पाहिजे. त्याप्रमाणे वरील पदार्थांचं प्रमाण कमी जास्त करा.
२. आता एका पसरट प्लेट मध्ये थोडं पाणी घ्या. ह्या पाण्यात राईस पेपर बुडवायचे आहेत म्हणजे ते नरम पडतील आणि रोल वळता येतील. राईस पेपर यात बुडवला की एका बाजुला २ सेकंद ठेवा. मग उलटा करा आणि परत फक्त २ सेकंदच थांबा. तो कागद हाताला अजुनही कडकच लागेल तेव्हाच तो बाहेर काढा.
३. तो अर्धवट नरम पडलेला राईस पेपर कटिंग बोर्डवर ठेवा. आता त्यावर वरच्या भाज्या आणि राईस नूडल्स थोड्या थोड्या घाला. याचा रोल करायचा आहे त्यामुळे भाज्या मध्यभागी न घालता मध्याच्या एका बाजुला घाला. (आठवा: बरीटो करताना कशा घालतात?)
४. आता याचा बरीटो समजुन गुंडाळी करायची आहे. आधी दोन्ही साईड ने भाज्या झाका मग लहान बाजू दुमडुन जितकी घट्ट करायला जमेल तशी गुंडाळी करा.
५. झाला फ्रेश स्प्रिंग रोल तयार. डिप मध्ये बुडवुन फस्त करा.
*
एक खाल्लात की खातच रहावसं वाटतं. त्यामुळे एकदम बनवुन ठेवा. सगळ्या गोष्टी मध्ये ठेवुन 'बिल्ड युअर ओन रोल' करायला पण मजा येते.
१. प्रोटिन साठी टोफू, शिजवलेले श्रिंप, पनीर घालू शकता.
२. भाज्या ज्या असतील त्या चालुन जातात.
३. राईस पेपर पाण्यात बुडवुन मऊ करताना तो पूर्ण मऊ व्हायच्या आधीच भाज्या भरायला घ्या. कारण भाज्या भरुन होईपर्यंत तो आणखी मऊ होतो. आधीच खूप जास्त नरम पडला तर मग गुंडाळी करताना नीट हाताळता येत नाही. त्रास होतो.
@admin: पाककृतीचं टेम्प्लेट
@admin: पाककृतीचं टेम्प्लेट गणेशोस्तव ग्रुपात देता येईल का? मी तिकडच्या एका पाककृती मधुन कॉपीपेस्ट करुन जुगाड केला. पण तो सर्च साठी अजिबात फ्रेंडली नसावा असं वाटतं.
वॅाव अमितव, मस्तच दिसतोय रोल.
वॅाव अमितव, मस्तच दिसतोय रोल.. माझी फेवरेट डिश आहे ही
भारी दिसताहेत रोल्स.
भारी दिसताहेत रोल्स. आमच्याकडे पण आवडता प्रकार आहे .
वा मस्त दिसताहेत रोल्स!!
वा मस्त दिसताहेत रोल्स!! हेल्दी पण टेस्टी
एकदम भारी.
एकदम भारी.
मस्त रेसीपी. नक्की करेन.
मस्त रेसीपी. नक्की करेन. राइस पेपर अमेझॉन वर मिळतो भारतात. व्हिएतनामी स्वयंपाकाचे सर्व साहित्य मिळते. पीनट बटर डिप पण भारी आहे.
हे रोल्स तळलेले पण मिळतात पण वरील रेसीपी जास्त हेल्दि आहे.
भारी! आमच्याकडेही हिट आयटम
भारी! आमच्याकडेही हिट आयटम आहे हा!
मस्त दिसतायत रोल्स.
मस्त दिसतायत रोल्स.
मस्त!
मस्त!
मस्त दिसतोय.मूळ पदार्थ
मस्त दिसतोय.मूळ पदार्थ खाल्लेला नाही.
भाज्या शिजवायच्या नाहीत का?कच्च्याच रोल मध्ये भरतात?थोड्या वाफवून घेतल्या तर?
डीप ची रेसिपी मस्त वाटतेय.
अनुचीच शंका +१
अनुचीच शंका +१
भाज्यांमध्ये चवीला तिखट मीठ घालायचं नाही का? डीपमध्ये आहे तरी सारणामध्ये थोडं हवं....
मस्त रे!
मस्त रे!
हेल्दि प्रकार दिसतोयही छान.
हेल्थफुल प्रकार दिसतोयही छान.
राइस पेपर हा नवा जिन्नस कळला.
इथले स्टेप्स चे फोटो कुठे
इथले स्टेप्स चे फोटो कुठे गेले?की मलाच दिसत नाहीयेत
(दिसले दिसले परत)
@अमितव : आता दिले आहे आणि हा
@अमितव : आता दिले आहे आणि हा लेखनाचा धागा आता पाककृती प्रकारात नेला आहे. तुमच्या या पाककृती मुळे मायबोलीवरच्या "व्हियेतनामी" प्रादेशिक प्रकाराचे उद्घाटन झाले आहे.
@me_anu या धाग्याचे पाककृती प्रकारात रुपांतर चालू होते तेंव्हा काही वेळ त्या पायर्या दिसत नव्हत्या. तुमचे डोळे अगदी व्यवस्थीत आहेत.
मस्त दिसताहेत रोल्स.
मस्त दिसताहेत रोल्स.
वाह वाह
वाह वाह
माझे डोळे ठीक आहेत ☺️
मायबोलीवर व्हिएतनाम विभाग आला.चला आता अजून टाका रेसिपी(आम्ही आणि मुलं अजून नारिंगी ग्रेव्ही मधून बाहेर न पडल्याने या रेसिपी नुसत्या वाचतो.पण कधीतरी करायच्या आहेत)
मस्तच आहे रेसिपी . कलरफुल
मस्तच आहे रेसिपी . कलरफुल दिसतेय.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
थँक्यू वेमा.
अनु, मंजूताई, बाहेर मिळतो त्यात भाज्या कच्च्याच असतात. राईस पेपर ओला केला की तो हळूहळू प्रचंड चिकट बनतो. त्यामुळे पेपरला भाज्या आरामात चिकटतात. खाताना कच्च्याच छान लागतात. वाफवल्या की मला वाटतं आणखी पाणी सुटुन लिबलिबीत होतील आणि क्रंच निघुन जाईल. एका रोल मध्ये प्रत्येक भाजीचे जेमतेम २ फारतर ३ ज्युलिअन येतात. बकरी झाल्याचा फील फार येईल असं वाटत असेल तर तसं नाही होत.
राईस पेपर मध्ये थोडं मीठ असतं. त्यामुळे मूळ चवीच्या भाज्या, थोडा खारट राईस पेपर आणि चविष्ट डिप याच्या चवी जिभेवर अदला बदल करत राहिल्या की मजा येते. डिप सुद्धा मला माईल्ड चवीचं क्रिमी जास्त आवडतं. पण आवडत असेल तर तिखट जास्त घालुन चव आवडी प्रमाणे बदलू शकता. हा रोल डीप फ्राय करुन डिप ( सॉरी कान्ट रेझिस्ट!) बरोबर खायचा असेल तर भाज्यांना थोडं मीठ लावावं लागेल कदाचित. मी कधी केलं नाहीये.
भाज्या अगदीच बेचव वाटत असतील तर राईस पेपर वर भाज्या घालून झाल्या की त्यावर हव्या त्या चवीचं सॉस/ चटणी/ किंवा वरच्याच डिपची थोडी नक्षी घालू शकता.
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
मस्त!!!!
मस्त!!!!
#पाकीटढकलू (pushing the envelope). अॅडमिन टीम पण हा "खेळ" एंजॉय करते आहे असा संशय आहे. एकदम सगळे १९५ देश प्रादेशिक मध्ये देऊन टाकायचे नि "आता गिळा काय गिळायचं" करायचं तर ते बांदेकर भाऊजीं एक एक पैठणी दिल्यागत एक एक प्रादेशिक शब्दखुण देत आहेत.
छान ईण्टरेस्टींग आयटम आहे
छान ईण्टरेस्टींग आयटम आहे
राईस पेपर हा आयटम मला माहीत नव्हता.. नवीन कळाला.. बहुधा
वा वा वा ! मस्त रेसिपी.
वा वा वा ! मस्त रेसिपी. व्हिएतनामी फ व असे स्प्रिंग रोलस माझेही प्रचंड आवडते. पण हे रोल्स करायला कठीण असेल असे वाटून करायला कधी गेले नव्हते. रेसिपीबद्दल अनेक धन्यवाद. सामान आणायला पळते आता.
मस्त दिसतेय रेसिपी आणि एन्ड
मस्त दिसतेय रेसिपी आणि एन्ड रिझल्ट. पण भाज्या अशाच कच्च्याच खाणं मला किंचीत बोअर वाटतंय.
तांदुळाच्या सालपापड्या चालतील
तांदुळाच्या सालपापड्या चालतील का, राईस पेपर म्हणून?
Chhan वाटतेय.
Chhan वाटतेय.
मस्त रेसिपी अमित. खूप छान
मस्त रेसिपी अमित. खूप छान स्टेप बाय स्टेप दिली आहेस रेसिपी. आवडता पदार्थ आहे हा. ब्रिस्बेनच्या उन्हाळ्यात बाहेर भटकंतीला जातांना हटकून राईस पेपर रोल घेऊन जातो आम्ही आमच्या आवडत्या टेक अवे मधून. प्रत्येक भाजीची स्वतंत्र चव आणि मग एकत्रित चव, हा एक मस्त अनुभव आहे. खूप रिफ्रेशिंग खाऊ आहे हा.
मस्त आहे रेसिपी! करायला हवी.
मस्त आहे रेसिपी! करायला हवी.
Tempting
Tempting
नानबा, माझ्याही मनात आले.
नानबा, माझ्याही मनात आले.
Pages