व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ४(क्रमशः)

Submitted by समई on 2 January, 2019 - 04:02

आज सकाळी मृणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्या.
व्हॅन cao dia temple ला पोचली. देवळाचे प्रवेशद्वार रंगीत नक्षीकारीने सजलेले होते.व्हिएतनाम,कंबोडियाचे वैशिष्ट हे आहे की सर्व देवळे,मिनार अतिशय सुंदर ,विविध रंगांनी केलेल्या नक्षीकामाने सजवलेले असते.ह्याचेही प्रवेशद्वार,मिनार असेच सुंदर आहेत.IMG-20181209-WA0021.jpgIMG-20181209-WA0024.jpgIMG-20181227-WA0036.jpg

ह्या मंदिराचे आवार भव्य आहे.समोर सुन्दर नक्षीदार प्रवेशद्वार आहे.आजूबाजूला सुंदर बगीचे आहेत,ज्यात विविध रंगाची आकर्षक फुलझाडे दिसली. व्हिएतनाम मध्ये सगळ्या बागांमध्ये अनेक झाडांचे बोन्साय केलेले दिसले.बाजूलाच एक घोड्यावर बसलेला पुतळा आहे.मी गाईडला हा कोण असे विचारले तर तो म्हणाला हा तुमच्या देशातला सिद्धार्थ आहे,जो पहिले राजकुमार
होता.एक उंच सुंदर मिनारही होता.मंदिर आतून तर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले होते.सगळीकडे स्वच्छता होती,शांती होती.मंदिरात जोराने बोलायला परवानगी नाही.छोटेस्कर्ट,किंवा फ्रॉक घातलेल्या स्त्रियांना पण आत जाऊ देत नाहीत. व्हिएतनाम आणि कंबोडियात सर्व दर्शन स्थळी टॉयलेट्सची चांगली व्यवस्था आहे.

IMG-20181209-WA0022.jpg

IMG-20181230-
WA0032.jpg
असे चार मिनार आहेत
IMG-20181230-

WA0019.jpgIMG-20181209-WA0049.jpg
देवळात मोठा हॉल आहे,ज्यात अनेक आकर्षक खांब आहेत, छत निळ्यारंगाचे आहे.IMG-20181230-WA0023.jpg

कावोडाईस्ट लोक सर्व धर्म मानतात.ते एकच दैवी शक्ती मानतात,ज्या शक्तीने ब्रम्हांड निर्माण केले आहे.त्यांच्याआहे या विश्वासाचे प्रतीक एक दैवी डावा डोळा आहे ज्यात यांग म्हणजे पुरुष शक्ती जी सकारात्मक ,विस्तारवादी, ताळ मेळ गतीविधींचे प्रतीक आहे जी पश्चिमेची राणी यिन च्या गतीविधीने संतुलीत होते.
हे लोक प्रार्थना,पूर्वजांची वंदना,अहिंसाआणि शाकाहार वर विश्वास ठेवतात.जगभर असलेल्या विविध धर्मांमध्ये समानताआहे असेही ते मानतात.त्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे पिवळ्या,निळ्या,लाल आणि पांढऱ्या रंगाचे रोब घातलेले भक्त असतात.पिवळा रंग बौद्ध धर्माचे प्रतीक,लाल रंग,taaoism, लाल रंग confucianism चे प्रतीक आहे.

प्रत्येक धर्मगुरुच्या टोपीच्या मध्यभागी दैवी डोळा भरतकाम केलेला आहे,ज्यात यिंग आणि यांग शक्ती आहे.मोठ्या हॉल मध्ये हे लोक प्रार्थना करतात,तिथे आपल्याला जायची परवानगी नाही.बाहेरच्या लोकांना मागे गॅलरीतून ही प्रार्थना बघता येते.
हॉल मध्ये असलेल्याअनेक खांबांवर ड्रॅगन,सात डोकी नाग असे
डिझाइन आहे.
IMG-20181209-WA0049.jpgIMG-20181230-WA0023.jpg
आकर्षक दैवी डोळाIMG-20181227-WA0014.jpg
डोळ्यावरचे डेकोरेशन
IMG-20181227-
WA0049.jpg
वेगवेगळे रोब घातलेले भक्त
IMG-20181227-WA0051.jpg

ह्यानंतर आम्ही हो ची मिन्ह च्या उत्तरपश्चिम दिशेला असलेल्या
प्रसिद्ध कू ची tunnels पहायला निघालो.जेवणाची वेळ झाली असल्यामुळे गाईडने एका ठिकाणी गाडी थांबवली
आम्ही आत गेलो तर खूप झाडेआणि फुले असलेले एक रेस्टॉरंट
होते.आम्ही आत गेलो.आम्ही तिघी एका टेबल वर आणि बाकी दुसऱ्या टेबल वर बसले.तिथले लोक व्हिएतनामी भाषा सोडून दुसरी कोणाचीच भाषा बोलत नाहीत.आता टुरिस्ट भरपूर येत असल्यामुळे गाईड बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात,आणि आता हॉटेलमध्ये मोडकेतोडके इंग्लिश त्यांना समजते,किंवा खुणा करून सांगावे लागते.
गाईडने आमच्या साठी त्यांच्या भाषेत सांगितले. आमच्या साठी मोठे ऑम्लेट,सॅलेड, प्रत्येकी साठी वेगळा भात,आणि सूप वैट्रेस ने आणले.दुसऱ्या ग्रुपसाठी पण त्यानेच ऑर्डर दिली.त्याप्रमाणे त्यांच्या साठी फिशकरी,चिकन,सॅलेड आणि प्रत्येकासाठी भात आणला.इथे वेगळा चिकट भात खातात. त्याची गंमत अशी आहे की तुम्ही जर भात एकदम रस्सा घालून खाल्ला तर तो हळूहळू
वाढत जाऊन डबल होतो.त्यामुळे थोड्या थोड्या भातात रस्सा घालून खावे लागते.ग्रेव्ही नारळाच्या दुधात वेगवेगळे herbs
घालून बनवतात.चवीला आपल्याला आवडते,कारण आपण
आपण महाराष्ट्रात नारळाचा खूप वापर करतो,पण उत्तरभारतीय
लोकांना असे जेवण आवडणार नाही.कारण इथे gravy ह्याच पध्दतीने बनवली जाते.जेवणानंतर कापलेले कलिंगड,फोडी केलेले अननस आणून ठेवले.इथे जेवणानंतर स्वीट डिश म्हणजे फळेच खातात असे वाटते.कारण इथे केक,pastry ची बरीच दुकाने दिसली,पण लोकल मिठायांबद्दल माहिती मिळाली नाही,आईस्क्रिम पार्लरही दिसले नाही.
जेऊन आम्ही कू ची tunnelsच्या दिशेने निघालो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults