लहानपणापासुन नारायण उर्फ नारुला साप या प्राण्याबद्दल खुप प्रेम. त्याला डिस्कवरी चैनेल वरील साप पाळावेसे वाटत. मात्र जसजस त्याच वय वाढु लागल. आणि प्रत्यक्ष आयुष्यात सापांशी संपर्क येऊ लागला तसे कळुन चुकले साप हा काही मांजरासारखा पाळीव प्राणी नाही. आणि योगायोग म्हणा किंवा आणखी काही त्याला सारखे साप दिसत. इतके कि त्याच्या प्रेमाची जागा भीतीने घेतली. त्याच्या गावात जर कोणी गुरुवारी मांसाहार केला तर त्याला सापाचे दर्शन होते. अशी बऱ्याचजणांनी अनुभवलेली अंधश्रद्धा होती. या भीतीने गावातील कोणीही या दिवशी मांसाहार करत नव्हते. आणि जरी केलेच तरी त्याला दुसऱ्या दिवशी हमखास सापाचे दर्शन व्हायचेच्.
एकलव्य तेव्हाचा आणि आजचा
संदर्भ : ↑ महाभारत की कथाएँ – एकलव्य की गुरुभक्ति
।
महाभारतातील कथेच्या अनुसार , एकलव्य आराधने साठी बसला असता ..एक कुत्रा त्याच्या आराधनेत बाधा उत्पन्न करू लागला ..खूप वेळ सहन केल्या नंतर एकलव्याने आपल्या भात्यातील बाण काढले आणि कुत्र्याच्या मुखात अश्या पद्धतीने संधान केले कि त्याचा आवाज तर बंद झाला पण त्याच्या मुखाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही .
मी खर सांगु, मला ना उंच आकाशात उडायचय
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचय
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाउन पोचायचय
तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
आजकाल कधी नव्हे तो मी धावताना दमायला लागलोय
धावता धावता मधेच मागे वळुन बघायला लागलोय
मी पुढे जाण्यापेक्षा बाकीचे मागेच आहेत ना
याची खात्री करायला लागलोय
कुठुन आलो ते पहायला आता वेळ नसतो
कुठे चाललो त्याचे आताशा भान नसतं मला
अक्शरश: काळ मागे लागल्यासारखा पळत असतो मी
डोळ्यावर झापडं चढल्येत गं माझ्या
पाठीवर आसूड कुणाचा उडतोय
गुजरातेतील गीर अभयारण्याच्या क्षेत्रात पर्यावरण जागृतीचे काम करणारे अमित जेठवा यांची २० जुलै रोजी निर्घृण हत्त्या झाली त्याला आता एक महिना लोटला आहे. विशेष म्हणजे त्यांची हत्त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आवारात, दिवसाढवळ्या आणि ‘सत्यमेव’ नावाच्या इमारती समोर झाली! न्यायालयीन काम आटोपून अमित आपल्या जिप्सीमध्ये बसण्याच्या तयारीत असतांनाच बाईक वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी point blank range मधून म्हणजे अगदी जवळून अमित जेठवांवर गोळ्या झाडल्या आणि त्यात ते जागीच ठार झाले.