फ्रेंडस फॊरएवर
Submitted by Nikhil. on 8 December, 2017 - 22:42
लहानपणापासुन नारायण उर्फ नारुला साप या प्राण्याबद्दल खुप प्रेम. त्याला डिस्कवरी चैनेल वरील साप पाळावेसे वाटत. मात्र जसजस त्याच वय वाढु लागल. आणि प्रत्यक्ष आयुष्यात सापांशी संपर्क येऊ लागला तसे कळुन चुकले साप हा काही मांजरासारखा पाळीव प्राणी नाही. आणि योगायोग म्हणा किंवा आणखी काही त्याला सारखे साप दिसत. इतके कि त्याच्या प्रेमाची जागा भीतीने घेतली. त्याच्या गावात जर कोणी गुरुवारी मांसाहार केला तर त्याला सापाचे दर्शन होते. अशी बऱ्याचजणांनी अनुभवलेली अंधश्रद्धा होती. या भीतीने गावातील कोणीही या दिवशी मांसाहार करत नव्हते. आणि जरी केलेच तरी त्याला दुसऱ्या दिवशी हमखास सापाचे दर्शन व्हायचेच्.