सख्या रे ...
जगातला तत्वनिष्ठ, बुद्धिवादी पण मानवतावादी चांगुलपणा - लहानपणी यालाच कृष्ण मानलं अन आता नास्तिक असले तरी शेवटी तो सखा असण्याशी मतलब ना; मग त्या नावाला हरकत कसली ?
जगातला तत्वनिष्ठ, बुद्धिवादी पण मानवतावादी चांगुलपणा - लहानपणी यालाच कृष्ण मानलं अन आता नास्तिक असले तरी शेवटी तो सखा असण्याशी मतलब ना; मग त्या नावाला हरकत कसली ?
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||
दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||
गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||
मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११
"आजी ग, तुझ्या घरातला तो कृष्णाचा फ़ोटो कुठे आहे? ह्या घरात लावला नाहीयेस का?" आजोबा गेल्यानंतर आजी मुंबईला स्थायिक झाली त्यालाही १-२ वर्षं झाली होती. तिच्या घरात मी आणि आई गप्पा मारत बसलो होतो.
"कुठला ग?"
"नाही का मधल्या खोलीतून किचनकडे जाणार्या दरवाजाच्या वर लावला होता तो?"
"तो होय. अग सामानाच्या हलवाहलवीत कुठे गेला काय माहित. इथे मुंबईत आल्यावर सापडला नाही."
"शुअर आहेस तू? सगळं सामान पाहिलंस?" मी पुन्हा खोदून विचारलं.
"हो, पाहिलं ना. नाहीये कुठेच. पण तू का विचारतेयस?" आजीने थोडंसं आश्चर्याने विचारलं.
महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?
"कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून.
विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.
घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.