"मिले हो तुम हमको.."
या शशकचा प्रिक्वेल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विडीओ कॉलवरून तासभर गुलूगुलू गप्पा मारल्यानंतर प्राचीनं विषय छेडलाच. माझ्या लाख समजावल्यानंही ती समजलीच नाही.
".....ते बाकी मला काही माहिती नाहीये. माझा बड्डे आहे, प्रत्येकवेळेस आपण एकत्र सेलिब्रेट केलाय. तू यायलाच हवं."
आता मीही वैतागलो,
हिच्याशी भांडायलाच हवं.. पण तिनं कॉल कट् केला.
तिन दिवसांनी रात्री बारा वाजता―
अंधाऱ्या कोपऱ्यातून, विझत चाललेल्या चितेच्या ज्वालांवर त्राटक लावून बसलो होतो. आजची शेवटची अमावस्या. बरोबर बारा वाजता हातातली साधनं चितेत टाकली की इप्सित साध्य !
बाराच्या ठोक्याला इकडे फिरकणारं कोणी नसल्यानं निर्धास्त होतो.
"ॐss महाकालेssय नम: । ॐss अघोराssय नम: ॥"
शेवटची पंधरा मिनिटे उरली.
"स्त्री सक्षमीकरण"
"तुझ्याss **चा..."
तिच्या तोंडून निघालेल्या त्या कचकचीत उद्गारांची मला गंमत वाटली
आणि त्याचबरोबर 'स्त्री सक्षमीकरण' म्हणजे नक्की काय, याची त्या काळोखातही ओळख झाली;
तेव्हा
जेव्हा तिने त्या आडदांडाला जमल्या गर्दीसमोर बदडबदड बदडलं
आणि
पाठीमागे वळून आपल्या लेकराकडे बघत म्हणाली,
"चाल माज्याबरूबर, मेला तुझा बाप आजपास्नं !"
―र!/२४.५.१८
"मनधरणी"
दिवसभर पोटांसाठी लाचारासारखी घिसापिट करून
बॉसचं ऐकून थांबल्यानं रात्री उशीरा घरी परतलो तेव्हा
फणकाऱ्यानं ती जेव्हा म्हणाली,
'कशाला आलास आत्ताशी ? काळं कर तुझं थोब्बाड'
खरं सांगू ? मलाही वाटलं द्यावा तिला एक जवाब, थुत्तरफोड !
प..पण..
सोफ्यावर निजलेल्या त्या चिमुकल्या जिवाला बघून शांत झालो मी
आणि
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !
―र!/२४.५.१८
[थुत्तरफोड शब्दासाठी साभार, मायबोलीकर.]