Submitted by आनंद. on 29 April, 2020 - 02:03
"मिले हो तुम हमको.."
या शशकचा प्रिक्वेल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विडीओ कॉलवरून तासभर गुलूगुलू गप्पा मारल्यानंतर प्राचीनं विषय छेडलाच. माझ्या लाख समजावल्यानंही ती समजलीच नाही.
".....ते बाकी मला काही माहिती नाहीये. माझा बड्डे आहे, प्रत्येकवेळेस आपण एकत्र सेलिब्रेट केलाय. तू यायलाच हवं."
आता मीही वैतागलो,
हिच्याशी भांडायलाच हवं.. पण तिनं कॉल कट् केला.
तिन दिवसांनी रात्री बारा वाजता―
अनेकदा प्रयत्न करूनही तिला फोन लागत नव्हता. शेवटी वैतागून एक अखेरचा प्रयत्न म्हणून व्हाट्स अपवर आलो. तिनं नुकतंच अपडेट केलेलं स्टेटस् दिसलं,
"स्टार्टिंग न्यू जर्नी विथ दिगू !"
सोबतीला दोघं बड्डे केक एकदुसऱ्याला भरवत असलेला विडीओ.. पार्श्वभूमीवर संगीत,
'मिले हो तुम हमको...'
माझा तिळपापड झाला. तोंडातून आपसूक शिवी बाहेर पडली,
'च्यायला ह्या लॉकडाऊनच्या !'
―२८.०४.२०
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लॉकडाऊनमुळे बड्डेला न आल्याने
लॉकडाऊनमुळे बड्डेला न आल्याने दुसरा पकडला?
लॉकडाऊनमध्ये बड्डे किती गरजेचा असतो बघा
छान!!..
छान!!..
Lockdown के side effects!
Lockdown के side effects!
लॉन्ग डिस्टन्स बाबूभैया ...
लॉन्ग डिस्टन्स बाबूभैया ... बहुत ब्रेक अप हो रे ...