Submitted by आनंद. on 17 December, 2019 - 11:21
अंधाऱ्या कोपऱ्यातून, विझत चाललेल्या चितेच्या ज्वालांवर त्राटक लावून बसलो होतो. आजची शेवटची अमावस्या. बरोबर बारा वाजता हातातली साधनं चितेत टाकली की इप्सित साध्य !
बाराच्या ठोक्याला इकडे फिरकणारं कोणी नसल्यानं निर्धास्त होतो.
"ॐss महाकालेssय नम: । ॐss अघोराssय नम: ॥"
शेवटची पंधरा मिनिटे उरली.
एकाएकी फाटकाच्या आवाजानं तंद्री भंगली. गडद अंधारातून बाहेर पडलेले पाचजण हातात हात गुंफून चितेपल्याड जाताना दिसले.
तिन मुलं दोन मुली.. एकीच्या हातात नंगी तलवार ! माझी अस्वस्थता उत्सुकतेत बदलली.
ते चितेपलीकडील पटांगणात पोहोचले. काहीतरी खडबड ऐकायला आली..
पुन्हा स्मशानशांतता !
बराच वेळ गेला आणि एकच गलका झाला,
"हैप्पी बड्डे टू यू ! हैप्पी बड्डे डिअर माया !"
.
.
.
.
.
"चौक्या लावायला विसरलास !" कानांत शब्द घुमले.
―र।/ १७.१२.१९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मशानच उरलंय फक्त.. नविन फॅड
स्मशानच उरलंय फक्त.. नविन फॅड दुसर काय..
(:-)
(:-)
प्रेतयोनीतील वाढदिवस होता का
चौक्या म्हणजे काय?
चौक्या म्हणजे काय?
चौक्या म्हणजे काय?>>>मलाही
चौक्या म्हणजे काय?>>>मलाही नाही समजले
चौक्या हा शब्द मलाही कळला
चौक्या हा शब्द मलाही कळला नाही.
एखादा विधी करण्यासाठी आवश्यक
एखादा विधी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रायव्हेसीसाठी काही सिक्युरिटी सेटिंग्स पैकी असावे ते किंवा फायरवॉल टाइप समथिंग
चौक्या हा शब्द मलाही कळला
चौक्या हा शब्द मलाही कळला नाही.
क्रिकेट खेळताना जो सारखा चौके
क्रिकेट खेळताना जो सारखा चौके मारतो त्याला चौक्या बोलतात.
एखादा विधी करण्यासाठी आवश्यक
एखादा विधी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रायव्हेसीसाठी काही सिक्युरिटी सेटिंग्स पैकी असावे ते किंवा फायरवॉल टाइप समथिंग Wink>>>> मलाही तेच वाटतयं. कथा छान आहे. जरा हटके !
जबरदस्त जमले शशक.
जबरदस्त जमले शशक.
नाव पण भारीच आहे.
मस्त लिखाण
मस्त लिखाण
चौक्या म्हणजे चौकी-पहारे बसवणे म्हणतात त्यातील का?
>>>स्मशानच उरलंय फक्त.. नविन
>>>स्मशानच उरलंय फक्त.. नविन फॅड दुसर काय..>>>
दिप्ती, तुझं नेटवर्क कच्च आहे ! 
तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं फॅड स्मशानापर्यंत पोहोचल्याची विश्वसनीय माहिती खास सूत्रांकडून आम्हाला प्राप्त झाली आहे !
>>प्रेतयोनीतील वाढदिवस होता का तो?>>>>
सामो, मी लिहिलं तेव्हा नव्हता. आपली कमेंट वाचून आता ती शक्यता निर्माण झाली.
>>>चौक्या म्हणजे काय?>>>
कथेत हा शब्द लिहित असतानाच, 'चौक्या म्हणजे काय' हा प्रश्न येणार आणि तो सस्मितच विचारणार असं वाटून गेलेलं.
भिकाजी आणि प्रि तम यांच्या प्रतिसादांना +७८६
*चौक्या- चौकीचं अनेकवचन !
चौकी म्हणजे पहारेकरी उभा रहाण्यासाठीचं ठिकाण.
कथेत दोन स्वतंत्र भाग आहेत.
एक म्हणजे स्मशानात काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी अनेक दिवसांपासून (अमावस्या) साधना करणारा साधक आणि दुसरा म्हणजे स्मशानात जाऊन तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करणारा मित्रमैत्रिणींचा गृप.
त्या गृपच्या ऐनवेळी तेथे टपकण्यामुळे त्या साधकाची अनेक दिवसांची मेहनत वाया जाते. मध्यरात्रीच्या सुमारास तेथे स्मशानात कुणी येणार नाही हे त्यानं गृहीत धरलेलं आणि त्यामुळे न लावलेल्या चौक्या.
शेवटच्या वाक्यातील 'चौक्या लावायला विसरलास' हे वाक्य; त्याचं अंतर्मन, त्याचा गुरु, तो जीची साधना करतोय ती अज्ञात शक्ती, त्याचा शत्रू किंवा ज्या मुलीचा वाढदिवस होता ती 'माया' यांच्यापैकी कोणीही उच्चारलेलं असू शकतं !
ते पाच मुलंमुली त्याचे प्रतिस्पर्धी/शत्रूही असू शकतात.
...तर
[आबैमुमा]
*चौक्या
तांत्रिक लोकं विधी करताना विधीत अडथळा येऊ नये, कुणी अडथळा आणू नये म्हणून चौक्या लावतात. या चौक्या लिंबं, नारळं, खिळे, टाचणी आणि...वगैरे वगैरे स्वरूपात असतात. त्यावर अदृश्य रूपातले पहारेकरी बसवलेले असतात जे फक्त त्या तांत्रिक लोकांनाच दिसतात म्हणे.
आता चौकीवर पहारेकरी कसा बसवायचा ते पुन्हा कधी
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद !
आनंद तुमच्या प्रतिसादामुळे
आनंद तुमच्या प्रतिसादामुळे उलगडा झाला. आवडली कथा.
नौटंकी +१.
नौटंकी +१.

खुशादा, हि "खास सुत्र" कोण आहेत हे जाणुन घ्यायला आवडेल!
विविक्षित मतप्रणाली असलेल्या
कथा वाचून एक विचार मनात आला -

विविक्षित मतप्रणाली असलेल्या लेखकाना आपल्या विचारांच्या विरोधातील प्रतिसाद आपल्या लिखाणावर येऊ नयेत म्हणून राजकीय धाग्यावर / ग्रुपवर अश्या चौक्या बसवता येतील का
म्हंजे त्यांचा पक्षीय प्रचार प्रसार विनाअडथळा होईल
विविक्षित मतप्रणाली असलेल्या
विविक्षित मतप्रणाली असलेल्या लेखकाना आपल्या विचारांच्या विरोधातील प्रतिसाद आपल्या लिखाणावर येऊ नयेत म्हणून राजकीय धाग्यावर / ग्रुपवर अश्या चौक्या बसवता येतील का Wink
म्हंजे त्यांचा पक्षीय प्रचार प्रसार विनाअडथळा होईल Light 1 + १११११
- भिकाजी अगदी मनातल बोललात.
धन्यवाद नौटंकी
धन्यवाद नौटंकी
खुशादा, हि "खास सुत्र" कोण आहेत हे जाणुन घ्यायला आवडेल!>>>

विविक्षित मतप्रणाली असलेल्या लेखकाना आपल्या विचारांच्या विरोधातील प्रतिसाद आपल्या लिखाणावर येऊ नयेत म्हणून राजकीय धाग्यावर / ग्रुपवर अश्या चौक्या बसवता येतील का
घ्या.
म्हंजे त्यांचा पक्षीय प्रचार प्रसार विनाअडथळा होईल>>>>
छे छे ! मग राजकीय आखाडा कसा रंगेल ? सगळी गंमतच संपेल.
बाकी तुमचा वरील प्रतिसाद बघून 'आपण कोण' अशी शंका मात्र मनांत डोकावली.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
कथेत हा शब्द लिहित असतानाच,
कथेत हा शब्द लिहित असतानाच, 'चौक्या म्हणजे काय' हा प्रश्न येणार आणि तो सस्मितच विचारणार असं वाटून गेलेलं.>>>>>>> काब्रं?
अंदाज आलेला काय असेल चौक्या. तरी विचारलं
आनंद वेलकम बॅक
आनंद वेलकम बॅक
सचिनकाका, सस्मित, पाफा
सचिनकाका, सस्मित, पाफा धन्यवाद