मनधरणी
Submitted by आनंद. on 24 May, 2018 - 12:18
"मनधरणी"
दिवसभर पोटांसाठी लाचारासारखी घिसापिट करून
बॉसचं ऐकून थांबल्यानं रात्री उशीरा घरी परतलो तेव्हा
फणकाऱ्यानं ती जेव्हा म्हणाली,
'कशाला आलास आत्ताशी ? काळं कर तुझं थोब्बाड'
खरं सांगू ? मलाही वाटलं द्यावा तिला एक जवाब, थुत्तरफोड !
प..पण..
सोफ्यावर निजलेल्या त्या चिमुकल्या जिवाला बघून शांत झालो मी
आणि
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !
―र!/२४.५.१८
[थुत्तरफोड शब्दासाठी साभार, मायबोलीकर.]
विषय: