कविता

संचित

Submitted by mayurlankeshwar on 20 May, 2008 - 05:39

तितक्याच जोमाने कोसळत राहतील
पायांशी मावळतीची उन्हं...
तितक्याच जोमाने उसळत राहतील
काजळ रात्री हळवे चंद्र...
वेचू वेचू म्हणता म्हणता
पानझडीसारखी साचत जातील वर्षामागून वर्ष,
आणि कुजबुजत राहतील अंगणात तितक्याच हळुवारपणाने

गुलमोहर: 

उगाच्......पल्लि

Submitted by पल्ली on 18 May, 2008 - 08:19

बोलता बोलता मी थांबतो
चालतो थांबतो-बोलतो...
कुठे पहातो? काय पहातो?
आक्रांती होतो-वाहतो!
मला कळेना, मी काय जाणतो?
मी काय पुसतो? पुसून टाकतो.
वाकड्यांची दुनिया सारी
मी स्वतःला भिन्न समजतो
सरळ वाटा चालता चालता
वळणच साधे विसरुन जातो!

गुलमोहर: 

हल्ली कठीण जातं....

Submitted by poojas on 17 May, 2008 - 14:06

विचारांच्या धाग्यात... शब्दांना गुंफणं...
हल्ली कठीण जातं....
भावनांचे पाश.. अलगद सोडवणं ही..
हल्ली कठीण जातं....

मीच माझ्याभोवती विणलेला .. मर्यादेचा कोष..
उसवलेल्या उणीवांतून.. दिसणारा रोष..
परीटघडीच्या आयुष्यातले.. अक्षम्य दोष..

गुलमोहर: 

मधुच॑द्र

Submitted by shonunil on 17 May, 2008 - 08:28

कुणी हारायचे कुणी जिन्कायचे नसती तिथे बन्ध,
लुटत जावे लुटू द्यावे
डोळे असुन अ॑ध,
कोणती हि स्पर्धा कोणता हा सण?
वेगवेगळ्या र॑गात र॑गतो आपण होवोनी द॑ग,
सोडउच नयेत अशी कोडी
स॑पूच नयेत असे क्षण,

गुलमोहर: 

सहवास

Submitted by shonunil on 17 May, 2008 - 07:38

गोड सहवास तुझा लाभता कविता माझी विरुन गेली,उरली सुरली पान॑ मग मी जमवून वहि बन्द केली,
पहाट तुझ्या कुशीत होई रात्रहि तुझ्या मिटीत,
स्वप्न उद्याची पहू लगलो
साटवून तुला दिटित,
अशीच कधी मधी सुचून जाते,
पहुण्यासारखी वेळी अवेळी,

गुलमोहर: 

नातं

Submitted by मीन्वा on 16 May, 2008 - 02:26

आता वाटतंय बरं झालं..
बरंच झालं एका परीनं.
संपलं नातं. नातं,
त्याबरोबर चिकटून येणार्‍या अपेक्षा,
जळवांसारख्या..
त्याबरोबरच अपरीहार्यपणे होणारे अपेक्षाभंग,
संपलं सारं.
आता कसा मोकळा श्वास घेता येईल मन भरुन..

गुलमोहर: 

सावळी माझी कविता

Submitted by snehajawale123 on 15 May, 2008 - 03:28

sawali_0.jpg
सावळे हे रुप माझे
सावळीच काया
सावलीही माझी
सावळीच आहे

सजवते आहे
सावळ्या तनुला
सावळ्या या गालावर
आज रक्तिमा आहे

सावळेच नभ सारे
जलधारा बरसता
त्सावळ्याच संध्याकाळी
सोबतीला असतात

गुलमोहर: 

बेवारस

Submitted by nikhilmkhaire on 14 May, 2008 - 06:28

नुकताच मी मेलो.
नुकताच म्हणजे;
अजून हातपायदेखील नीटसे आखडले नाहीत.
मरण्याआधी काही वेळ सगळ्यांनी खूप पळापळ केली...
मग कार्डिओग्राम आणि मी
एकत्रच नि:श्चेष्ट झालो.

डॉक्टर 'सॉरी' म्हणून निघून गेला.
कशासाठी ते नाही कळलं.

गुलमोहर: 

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......

Submitted by snehajawale123 on 13 May, 2008 - 04:27

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......

काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ...
ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी
आणि तो मेंदीचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...

गुलमोहर: 

दृष्टीभ्रमातले तळे

Submitted by snehajawale123 on 12 May, 2008 - 13:44

दृष्टीभ्रमातले तळे

डोई ऊन तळपले,
लागे चटका जीवाला,
तन नाजुक पोळले,
वेडा जीव तो जळाला...

वृक्ष साऊली भासली,
जीव हर्षून गेला,
खुप शिणली पाउले,
जीव थकुन तो गेला...

येयी थंड झोत वारा,
जीव हरखुन गेला,
तेव्हा तरारले मन,
जीव सुखाऊन गेला...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता