स्वप्न….
स्वप्न….
कधी नुसतंच रंजन असतं.
कधी काळजाचं स्पंदन असतं.
पण कसंही असलं तरी
ते जगण्याचं इंधन असतं..!
विचारांच्या जलधारेला
कल्पकतेचा स्पर्श जणू…
मनक्षितीजावर ये आकारा
स्वप्नांची इंद्रधनु..
इच्छा आकांक्षांच्या प्रवाहाला
स्वप्न….
कधी नुसतंच रंजन असतं.
कधी काळजाचं स्पंदन असतं.
पण कसंही असलं तरी
ते जगण्याचं इंधन असतं..!
विचारांच्या जलधारेला
कल्पकतेचा स्पर्श जणू…
मनक्षितीजावर ये आकारा
स्वप्नांची इंद्रधनु..
इच्छा आकांक्षांच्या प्रवाहाला
अश्रुंच्या थेंबानं विरघळणारी माणसं
जराशा उन्हानं कोमेजणारी माणसं
माणसांच्या गर्दित राहुनही
एकटी असणारी माणसं
एकांतामध्ये आपल्याच नादात
माणसांना गोळा करणारी माणसं...
चेहर्याची घडी न विस्कटणारी माणसं...
समजूत
काल माझा छकुला रडत होता
फ़ुगा फ़ुटला म्हणून....
मोठाला गोल रंगीबेरंगी
उंच उंच जाणारा....
फ़ुटला...
मग काढली समजूत त्याची...
"अरे रबरी फ़ुगा तो...किती दिवस टिकणारे?"
तो लडिवाळ बोलला..
"पण बाबानी दिलेला नं घेऊन माझ्या...मग?"
एक एकला जन्मा आलो
प्रवास एकाचा
दूजा काठावरून पाहे
खेळ प्रवाहाचा
वाटेवरती गुंतत गेलो
गुंफत एक कहाणी
अख्रेर उरले सहवासाचे
अथांग खारे पाणी
.................आज्ञात
१२०६,नशिक
जळण्यासाठी सरण राबते
मरण कुणाच्या हाती
जगण्यासाठी कळिज असते
काळजात अनुप्रीती
वसन्तात कोकीळ कुहुकते
स्वर्ग गुम्प्फते भवती
सवे सयीन्ची माळ
जवळही फिरकत नाही भीती
हाच जीवनाचा स्वरदाता
राग निळा सान्गाती
गुलाबांच्या ताटव्यात गुलाब होते खुप
लाल, पिवळे, गुलाबी,पांढरे रंगही होते खुप
कुणी घेतो फुललेला गुलाब तर कुणी घेतो कळी
तर कुणी टवटवीत गुलाब विकत घेई
का नेहमी पाहीले जाते बाह्यरुप
सुगंधाची परिक्षा करण्यात काय आहे चुक
काहीतरी लिहावं
म्हणुन वही उघडली,
उघडलेल्या वहीतली
पानं पानं चाळली.
चाळता चाळता
आठवणींची गर्दी झाली
हातात हात घालुन
आठवणींनी फेर धरला,
वरुन रोमांचाचा
झिम्मड पाऊस सुरु झाला...
कधी पापणी ओली झाली
कधी स्मितलकेर
अलगद लहरली
मंडळी, माझ्या पहिल्याच कथेला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून आणखी काही लिखाण इथे टाकायला हुरुप आलाय. ही कविता, मी माझ्या अनुदिनीवर ही टाकली आहे, पण मायबोलीवर खास तुमच्यासाठी.
*******************************
मी कामात गुंतलेली असते..
अचानक
स्वप्नं बघायची
स्वप्नं जगायची
उराशी बाळगायची
मांडीवर झोपवायची
आकाशात उडवायची
ओंजळीत घ्यायची
डोळे मिटुन हुंगायची
लाटांवरती सोडायची
पानांवरती ठेवायची
ढगाआडून पहायची
फांदी फांदीवर झुलवायची
गवतावरती डोलायची
वार्यासोबत वहायची
पाण्यामध्ये डुंबायची
पंखावरती झेलायची
प्राणासोबत तोलायची
ऊबेमध्ये जपायची
वहीमध्ये सांभाळायची
स्वप्नाळु स्वप्नं
सुंदर सजवायची!
न पाहिलेल्या देवासारखी
भक्तीभावानं पूजायची!!
हवामान फार बदललंय नाही...
आपण लहान असताना कसं होतं...
असंच काही ऐकत असतो आपण
असंच काही बोलत असतो आपण.
हवाच काय इथं तर वारासुद्धा
पुर्वीसारखा वहात नाही.
माणसामाणसांतला माणुस
अलिकडे कुठेच सहसा दिसत नाही..