Submitted by पल्ली on 20 May, 2008 - 07:57
हवामान फार बदललंय नाही...
आपण लहान असताना कसं होतं...
असंच काही ऐकत असतो आपण
असंच काही बोलत असतो आपण.
हवाच काय इथं तर वारासुद्धा
पुर्वीसारखा वहात नाही.
माणसामाणसांतला माणुस
अलिकडे कुठेच सहसा दिसत नाही..
पहाटेचं धुकं दिसतच नाही हल्ली,
मन झालंय मुकं; बोलतच नाही.
डोळ्यामध्ये असंख्य प्रश्नांचं पाणी
आणि खोलवर हरवलेल्या नात्यांची
तीच ती बेसूर गाणी...
रस्ते बदलले गाव बदलला
रस्त्याच्या मध्येच येतो म्हणुन
देव सुद्धा हलला.....
वेगवेगळ्या गर्दीमध्ये
हरवलेले चेहरे पुन्हा सापडत नाहीत,
मन मोकळे ओतावे असे
रिकामे कुणी असत नाही.....
हवामान आताशा बदललंय,
वातावरण तापायला लागलंय!
ढग भरून आले तरी
पाउस कसा बरसत नाही........
गुलमोहर:
शेअर करा
वेगवेगळ्य
वेगवेगळ्या गर्दीमध्ये
हरवलेले चेहरे पुन्हा सापडत नाहीत,
मन मोकळे ओतावे असे
रिकामे कुणी असत नाही.....
क्या बात है !!!
-प्रिन्सेस...
मन झालंय
मन झालंय मुकं; बोलतच नाही.
डोळ्यामध्ये असंख्य प्रश्नांचं पाणी
आणि खोलवर हरवलेल्या नात्यांची
तीच ती बेसूर गाणी...
--अगदी मनाला भिडलं... कवितेतील काही ओळी खूपच भावल्या... छान जमलीये.
प्रिन्सेस,
प्रिन्सेस, आय ऍम तुषार,
धन्स रे !
फारच
फारच सुंदर....
मन मोकळे ओतावे असे
रिकामे कुणी असत नाही.....
खल्ल्लास....
रस्ते
रस्ते बदलले गाव बदलला
रस्त्याच्या मध्येच येतो म्हणुन
देव सुद्धा हलला.....
वेगवेगळ्या गर्दीमध्ये
हरवलेले चेहरे पुन्हा सापडत नाहीत,
मन मोकळे ओतावे असे
रिकामे कुणी असत नाही.....
.............छानच, वादच नाही.
अप्रतिम
अप्रतिम
सगळ्या
सगळ्या मायबोलीकरांचे आभार
खरं आहे.
खरं आहे. मस्तच....