नशिबाची महती
रमली जुळली रुळली खाती
जी कधीच नव्हती
ज्ञात न हे कोणाला
कुठून आली ही नाती
अथांग सागर थेंब तयातिल
कसा लागला हाती
ओंजळीत हस्ताच्या
स्वाती घेउन आली मोती
शंख शिंपले असंख्य जाती
खारे पाणी भवती
शोध नेमका रत्नाचा
ही नशिबाची महती
रमली जुळली रुळली खाती
जी कधीच नव्हती
ज्ञात न हे कोणाला
कुठून आली ही नाती
अथांग सागर थेंब तयातिल
कसा लागला हाती
ओंजळीत हस्ताच्या
स्वाती घेउन आली मोती
शंख शिंपले असंख्य जाती
खारे पाणी भवती
शोध नेमका रत्नाचा
ही नशिबाची महती
किती फुले रमणीय तळ्याशी
पाखरांसवे उलगडती
शुद्ध कळ्यांवर मधुगंधास्तव
भ्रमरव गुंजारवती
भिरभिरणारी फूलपाखरे
रंगांवरती प्रीती
क्षणभंगुर जीवन
मरणावर जगण्याची अनुभूती
का न कळावी आपणास
ही मूक साजरी नीती
तुझ्या विना बघ झराहि आटला
कन्ठ कोकिळेचा सुकला
ऊन सावली फिरे जशी
आधार कुशीचा तुटला
नीळ मन्डपी भवसागर
आवेग डोहतळी काहुरला
उनाड वारा स्तब्ध जाहला
मेघ हवेतच विरला
धरा अजूनही तप्त कोरडी
जाग एकदा वचनाला
दवत्रुष्णा ओठात भिजू दे
नाद पावसाचा सरींवर
थेंबकोवळ्या आठवणी
मेघांचे अधिराज्य नभावर
घेउन आले पाणी
निश्चल वारा स्तब्ध कोकिळा
एकांतात विराणी
घुमू लागली व्हृदयामधली
मल्हाराची गाणी
स्वर भिजलेला ओघळला
पाझरू लागला आणी
खोल उरातुन फुलून आली
एक एकटा जन्मा आलो
अगणित रुण पावलो
बीज रुते मातीत
पावलागणी पोरका झालो
शत जन्मांचे घोटाळे
संभ्रमी सदा वावरलो
कशास आणि कुठे चाललो
इथे खरा बावरलो
रोज परीक्षा उपवासाची
नव्या रसांनी मढलो
विजयासाठी दिशा शोध
संदर्भ मिळे ना हरलो
मन सुन्न सुन्न होइ काही कसे सुचेना
ही स्तब्धता मनाला आली कशी कळेना
शैथिल्य आज आले गात्रात का कळेना
मंदावल्या मतीला का चालना मिळेना
चैतन्य लोपलेले स्रुष्टीतही दिसेना
एक कवडसा साद घालतो
पडद्यामागे कुणीतरी
झिरमिळ होते अंधाराची
चाहुल येते माजघरी
रेष कणांची चमचमते
गतकाळाचे मन जरतारी
लपंडाव सरल्या वेदांचा
राज्य पटावर सोनेरी
हळवेले डोळे हृदयाचे
तुडुंब भरती गाभारी
नेउ घालती युगे पलिकडे
मनाच्या दूरवरच्या कोपर्यात असते
निर्वाताची पोकळी...
भूतंखेतं, भितीबिती,
रागबीग, प्रेमबीम, मायाबिया
यांच्या पलिकडे असते ना तिच ती...
हळुहळू तयार होते
हळुहळू वाढत जाते...
सारं मन व्यापते
पण बाहेर नाही पडत...
दूर ओल्या क्षितीजावर आकाश टेकलेले,
ढग प्रुथ्वीच्या ओढीने हळवे झालेले,
मनाला येई भरते ग,
कधी दुपार हि सरते?
ही मातीची सुबक पणती, ती तांब्याची ईवलीशी दिवली
ही चकचकीत पितळी समई, ती चांदीची राजस निरांजनी
हा खानदानी लामणदिवा, तो धीरगंभीर नंदादिप...
आपल्या सोयीसाठी आम्हाला चांगलेच "बनवले" तुम्ही,