Submitted by अज्ञात on 1 June, 2008 - 06:58
तुझ्या विना बघ झराहि आटला
कन्ठ कोकिळेचा सुकला
ऊन सावली फिरे जशी
आधार कुशीचा तुटला
नीळ मन्डपी भवसागर
आवेग डोहतळी काहुरला
उनाड वारा स्तब्ध जाहला
मेघ हवेतच विरला
धरा अजूनही तप्त कोरडी
जाग एकदा वचनाला
दवत्रुष्णा ओठात भिजू दे
विझवू दे वणव्याला
..................अज्ञात
१२२३, नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
धरा अजूनही
धरा अजूनही तप्त कोरडी
जाग एकदा वचनाला....
ह्याचा अर्थ नाही समजला. कुणि कुणाला कसले वचन दिले रे?
आकाशाने धरणीला दिलेले प्रेमभराने बरसण्याचे तिला तृप्त करण्याचे वचन??
अगं
अगं पल्ली,
अशी वचनं ज्याने त्याने आपापली समजायची असतात ! पण तू म्हणतेस ते ही बरोबर आहे.
एकाच वाक्याचे जेंव्हा अनेक अर्थ लागतात तेंव्हा त्याची समावेशकता वाढते म्हणतात. जाउ दे फार अवघड वाटतंय बोलायला. असो. पण वटलं तर विचारायला हरकत नाही. एक खरं खरं सांगू का? विश्वास ठेव किंवा नको, झटका आल्यासारखं लिहितो मी आणि नंतर बघतो काय लिहिलं ते.
................................अज्ञात
अज्ञात,
अज्ञात, खूप वेगळं लिहिताय तुम्ही. प्रत्येक वेळी 'दाद' द्यायला जमतेच असं नाही... पण मी वाचते मात्रं जरूर. झटका तर झटका... लिहाच तुम्ही. खूप लिहा.