Submitted by poojas on 17 May, 2008 - 14:06
विचारांच्या धाग्यात... शब्दांना गुंफणं...
हल्ली कठीण जातं....
भावनांचे पाश.. अलगद सोडवणं ही..
हल्ली कठीण जातं....
मीच माझ्याभोवती विणलेला .. मर्यादेचा कोष..
उसवलेल्या उणीवांतून.. दिसणारा रोष..
परीटघडीच्या आयुष्यातले.. अक्षम्य दोष..
आणि तरीही.. निर्विकार चेहर्याने..
ठीगळ लावण्याचा.. अपरिमीत जोश..!
खरंतर..
जाणीवांच हे जीर्ण वस्त्र .. जीवापलीकडे जपणंच..
हल्ली कठीण जातं....
उसन्या अवसानाच्या रुमालानं .. अश्रूंना टीपणंच
हल्ली कठीण जातं...!!!
गुलमोहर:
शेअर करा
पूजा,
पूजा, सुरेख!... सुंदर कविता.
खर आहे
खर आहे एकदम....
आपल
आपल आपल्याला स्वताशि खोता वाग्न कसा कथिन जात हे दिस्त, छान आहे