कविता
स्वप्नातलं गाव ... !
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
वाळलं पान
फांदीपासून तूटलेलं पान..
पुन्हा जोडलं जाण्याची वाट पहात..
झाडाच्या बुंध्याशी, किती काळ थांबेल?
जीवनरस असेपर्यंत झगडेलही कदाचित,
ते वार्याच्या झोताशी.
एकदा का जीवनरस संपला,
की उरतं केवळ वाळलं पान,
एक छोटंसं सुख...
एक छोटंसं सुख
रस्ता चुकुन
माझ्या दारी आलं...
म्हणालं,
चुकुन आलो!
म्हंटलं,'आलायस तर थांब.'
जवळच कुठेतरी रहात असावं.
इतकं नाजुक, कोवळं
खुप आपलंसं वाटलं.
माझ्याशी त्याचं छान जमलं.
सगळ्या मोठ्या सुखांना
विसरायला लावलं त्यानं.
त्याला जीवन ऐसे नाव
वाटे एका क्षणी...
काय ती स्म्रुति सुमने
काय ती गंधित कुसुमे
काय ती इन्द्रधनुची कमान
अल्हाददायक, हळुवार. ॥१॥
वाटे दुसर्या क्षणी...
किती हे दुख:
किती या व्यथा
tipe asavanchi
"डेट"
"डेट" (एक काहिच्या काही गझल…!)
सोडुनी द्या मामला हा सेट नाही.
मी तिच्या नजरेत तितका ग्रेट नाही.
वाट बघणे नेहमीचे काम होते
तीच उशिरा, मी कधीही लेट नाही.
ती म्हणाली जाऊ जोधा अकबराला.
पाहिला मी अजुन "जब वी मेट" नाही.
सोबती
सुखाचा एखादाच श्रावण येतो,
अन दु:खांचे डोंगर उभे रहतात,
केवळ जगण्याच्या आशेपोटीच,
वाटेला सोबती हवासा वाटतो...
माणूस जिवन जगत असतो,
वाटसरु कितितरी जात असतात,
केवळ ह्रदयातील मायेपोटीच,
वाटेला सोबती हवासा वाटतो...
चंद्र सजल्या राती..
चंद्र सजल्या राती
झाडांची हिरवी पाती
तेजाने उजळून जाती
चंद्र सजल्या राती
आकाशी लुकलुक तारा
हलकेच वाहतो वारा
चंद्र सजल्या राती
उतरल्या चांदण्या वेली
आकाशच वरती खाली
चंद्र सजल्या राती
हे तरू जणू बैरागी
हे शिवाय शंकरा
ॐ नमः शिवाय शंकरा
विशुद्ध तू सुक्ष्म तू
सौम्य तू रुद्र तू
ॐ नमः ॐ नमः
नमः शिवा नमः शिवा ||
ॐ नमः शिवाय शंकरा
विराट वेग ज्ञान तू
ध्यान तू तपकार तू
अजर तू अनंत तू
अनादी तू कल्पांत तू ||
ॐ नमः शिवाय शंकरा
अकाल मृत्यू निवारका