Submitted by मीन्वा on 14 April, 2008 - 00:47
चंद्र सजल्या राती
झाडांची हिरवी पाती
तेजाने उजळून जाती
चंद्र सजल्या राती
आकाशी लुकलुक तारा
हलकेच वाहतो वारा
चंद्र सजल्या राती
उतरल्या चांदण्या वेली
आकाशच वरती खाली
चंद्र सजल्या राती
हे तरू जणू बैरागी
अन निरव शांतता जागी
चंद्र सजल्या राती..
गुलमोहर:
शेअर करा
आहा!
आहा!
छान!
छान!
वॉव, मस्तच
वॉव, मस्तच एकदम.
कविता
कविता आवडली मीनु.
हे तरू जणू बैरागी - ओळ विशेष आवडली!
मीनुताई,
मीनुताई, एक सुचवु का?
चंद्र सजल्या रातीपेक्षा चांदणं सजल्या राती कसं वाटतं?
कविता आवडेशच!
धन्यवाद
धन्यवाद प्रतिक्रीयांबद्दल सर्वांना.
हं चिन्नु विचार करते.
छान कविता
छान कविता आहे, मीनू.
'हे तरू जणू बैराग' कल्पना खूपच आवडली
सुंदरच,
सुंदरच, मीनू.
मला आवडलेल्या अगदी अगदी खास -
उतरल्या चांदण्या वेली
आकाशच वरती खाली
चांदण्याच
चांदण्याची एक निरव, सौंदर्यपुर्ण रात्र असे लोभसवाणे चित्र कविता वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले.
अप्रतिम
अप्रतिम
मस्त ग
मस्त ग मीनु!! आवडली.
अगदी
अगदी प्रसन्न कविता. छान.