आयपीएल२०१० व्यंगचित्र-११
आपल्या सचिनला गावली ना स्पेशल कॅप, टॉप बॅटींगबद्दल, तशीच आतां टॉप बेटींगबद्दल कॅप कोणाला द्यायची ,त्येची मिटींग चाललीय !
आपल्या सचिनला गावली ना स्पेशल कॅप, टॉप बॅटींगबद्दल, तशीच आतां टॉप बेटींगबद्दल कॅप कोणाला द्यायची ,त्येची मिटींग चाललीय !
मग, उद्याच्या मॅचला स्टेडियममध्ये कोणाचा झेंडा घेवून जाणार ? काँग्रेस, राष्ट्रवादी कीं भाजप ?
>"कोचि"मुळे गोची झाली , तरी चिकाटी नाही सोडायची ! आता आपण"गोची गोचिड" टीम काढूं !
खबरदार, मला आयपीएलचे नियम दाखवशील तर ! म्हणे, "स्ट्रॅटेजिक टाईम आऊट" घेऊन तुरुंगाबाहेर जायचंय !!
" मोदी, थरूर यांचा थोर आदर्श ठेऊन, टोलावलेला प्रत्येक चेंडू कोटी कोटी मोलाचा समजून त्यावर झेंप घालून आम्ही तो कवटाळूं. जय आयपीएल ! "
आजी , आमच्या टी-२० संघासाठी तुझं भजन मंडळ "चिअर" बाला म्हणून येईल का, असं आजोबानी
तुला विचारायला सांगितलय.
सौरव दादाचे संघाच्या सर्व खेळाडूंवर ताशेरे ओढून झाले. आतां बहुधा पाळी आहे संघाच्या
"चिअर गर्ल्स"ची !!