चित्रकला
वाट पाहते मी संध्यासमयी..
एक भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न..
मुळ चित्रकार :जॉर्ज फर्नांडेझ
माध्यम : ऑइल
(हे चित्र मी ४ वर्षापुर्वी काढले होते. कदाचीत प्रकाश चित्र थोडे खराब असेल कारण त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नव्ह्ता. आणि आता मुळ चित्र फ्रेम मधे बंद आहे त्यामुळे प्रकाश चित्र चांगले येत नाहिये.)
टिप : चित्र ३ फुट बाय २ फुट
चित्र खुप मोठे असल्याकारण आणि ३ वर्षापुर्वीचे असल्यामुळे प्रकाशचित्र मधे माझे नाव दिसत नाही त्याबद्द्ल क्षमा असावी तरिही ही कलाकृती माझीच आहे.
मायकेलाल जयकिशन !
एम एस पेंट चुकून उघडला.. नि मग काहितरी कसेतरी काढायचे म्हणून एक टिपी !! मायकेलालच्या पंख्यांची क्षमा पुढून.. ऑउ !!!
आई
मुलीची चित्रकला
हे चित्र माझी मुलगी श्रावणी हिने काढले आहे. ती सिनियर केजी मध्ये आहे. अशी खुप चित्र ती काढत असते आणि पसाराही तेवढाच करत असते. कधी कधी ही चित्रकला ती सोफ्यावर, लादीवर, शोकेसवर, भिंतीवर तिला आवडेल त्या जागी काढत असते. हे वहीवर काढलेले चित्र. ह्यात काय काय आहे ते ओळखा. हे चित्र तिच्या आजिने एका पिशवीत भरुन जपुन ठेवल आहे.
दुर्गा पुजा / दसरा
आजच आमच्या ऑफिसमधे दसर्याची पुजा केली. हि देवी मी परवा रात्री काढलीये. दरवर्षी नवीन देवी काढते. सर्व मायबोलीकरांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.