चित्रकला
सर्वांसाठी पेन्सील स्केच...
नमस्कार...मी इथे खुप छान छान पेन्सील स्केच बघितलेले आहे......माझी सुद्धा टाकावीशी वाटते.......तसा मी काही छान चित्रे काढत नाही....आपले हिशोबाचे काम करत करत...सवड म्हणुन..
पण......ही माझी न राहता......बाकी सगळ्यांनी आपपले स्केच टाकले तर........एकच ठिकाणी सगळ्यांना सर्वांचे स्केच बघण्यास मिळेल..........अपेक्षा आहे कि सगळे सहकार्य करतील......
लगान.............
काल काढलेलं चित्र
मला माहित आहे हे काही एवढ काही खास नाही पण माझ्यासाठी खूप सुरेख आहे कारण शाळेत असताना चित्रकला हा विषय म्हणजे १ मजेचा विषय. चित्रकलेची वही कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायची कारण चित्र काढताच यायची नाही.इंगीनीरिंग गेलो तिथे पण भरपूर त्रास झाला परंतु तिथे निभावल कस ते नाही सांगू शकत....................
पण काल हे काढलेलं चित्र कस माहित १ बारश्याची पत्रिका आलेली त्यावर हे चित्र होत ते बघून काढाल................
वेदान्त ची चित्रकला (वय ३ वर्ष )
वेदान्त ची चित्रकला (वय ३ वर्ष )
पेन्सील स्केच ...
सर्वांचे इतके छान छान चित्र बघून मला पण माझ काही द्यायची हुक्की आली ....
तसं फार काही चांगल चित्र काढण जमत नै मला पण बघण्यालायक ते नक्कीच असते अस वाटत मला ....
बारावीला असताना मी फावल्या वेळात स्केचेस काढायची ... त्यासाठी मग स्केच बुक असन आवश्यक नै वाटायचं मला ...
असाच काही टाईमपास स्केचेस पैकी काही नमुने तुम्हासमोर सादर .....
क्रुष्ण धवल
दोन सख्या
पक्षी (लेकीने काढलेला)
काल माझी मुलगी मिहिका (वय ५)डिसनी चा अप पिक्चर बघत होती (disney up) त्यात असलेला पक्षी आणि त्याची पिले तिने बघितली. लगेच पिक्चर संपल्यावर आई मी तुझ्यासाठी गंमत काढते म्हणुन त्यातला पक्षी आणी त्याचे पिलु काढले आहे.
दिवसातले २ तास तरी ती रोज चित्रे काढत असते. तिला खुप आवड आहे चित्रकलेची.
माझे तैलचित्राचे प्रयत्न
Pages
![Subscribe to RSS - चित्रकला](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)