लहानपणी रात्री टेरेस वर झोपून तारे बघताना त्या अनंत अवकाशाची आवड निर्माण झाली. जयंत नारळीकरांची पुस्तक,लेख वाचायला अवडायचे.
चंद्राच्या कला, मंगळ, गुरू, शुक्र, शनी, सप्तर्षि, मृग नक्षत्र अगदी शहरातील झगमगाटातही उठून दिसतात. ही रोजची मंडळी बघायला कधीही बर वाटत. पण ग्रहण हा काही औरच नजारा असतो.
ही कधीतरी घडणारी किमया नेहमीच मला भुरळ घालते. खग्रास चंद्रग्रहणात दिसणारा तो लालसर नारंगी रंगाचा Blood Moon किती मोहक वाटतो. आजपर्यंत दोनदा ते मोहक दृश्य बघण्याचा योग आला, रात्र जगवली त्यासाठी पण सार्थक झालं.
प्रचि०१-अ - चंद्र -शुक्र-मंगळ
हा लेख मी जानेवारीमधे झालेल्या ग्रहणाच्यावेळी लिहिला होता. आता कालच खग्रास चंद्रग्रहण झाल्याने इथे टाकत आहे.
=========================================
मागच्या आठवडयापासून व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर मेसेज यायला लागले की ३१ चा दिवस (की रात्र?) खास आहे. आणि खासियत काय तर एकाच दिवशी (आता पुन्हा दिवशी की रात्री? फार बोर मारतेय ना!) blood moon, blue moon, super moon आणि चंद्रग्रहण असं सगळं दिसणार आहे. मला बापडीला प्रश्न पडला की पृथ्वीला तर एकच चंद्र, मग ह्या एकाच चंद्राचे एवढे प्रकार दिसणार कसे!
तातडीची मदत हवी आहे. ग्रहण वगैरे काही पाळायचे नसते हे एखाद्याला समजवाणार्या खात्रीशीर लिंक हव्या आहेत.
आमच्याकडे फर्मान निघाले आहे की रात्री दहाच्या आधी जेवायचे नाहीतर एकच्या नंतर.. त्यामध्ये नाही..
आणि त्यातही रात्री दहानंतर उरलेले सारे शिळे अन्न, खारी बटर बिस्कीट फरसाण वगैरे सुका खाऊ जो अजून चार दिवस खाता येईल तो टाकून देणार आहेत.