![solar eclipse 2023](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/10/22/2023_SE_ELKO_NV_Mahendra_Wagle01.jpg)
लहानपणी रात्री टेरेस वर झोपून तारे बघताना त्या अनंत अवकाशाची आवड निर्माण झाली. जयंत नारळीकरांची पुस्तक,लेख वाचायला अवडायचे.
चंद्राच्या कला, मंगळ, गुरू, शुक्र, शनी, सप्तर्षि, मृग नक्षत्र अगदी शहरातील झगमगाटातही उठून दिसतात. ही रोजची मंडळी बघायला कधीही बर वाटत. पण ग्रहण हा काही औरच नजारा असतो.
ही कधीतरी घडणारी किमया नेहमीच मला भुरळ घालते. खग्रास चंद्रग्रहणात दिसणारा तो लालसर नारंगी रंगाचा Blood Moon किती मोहक वाटतो. आजपर्यंत दोनदा ते मोहक दृश्य बघण्याचा योग आला, रात्र जगवली त्यासाठी पण सार्थक झालं.
प्रचि०१-अ - चंद्र -शुक्र-मंगळ
प्रचि०१-ब चंद्र -शुक्र-गुरु -शनी
प्रचि०१-क - अष्टमीचा चंद्र -८०० मिमी टेलीफोटो लेन्स
प्रचि०१-ड - शनी -12०० मिमी टेलीफोटो लेन्स
प्रचि०१-इ - गुरु आणि त्याचे चंद्र -12०० मिमी टेलीफोटो लेन्स
प्रचि०२ - सप्तर्षि
प्रचि०३-अ - चंद्रग्रहण २०१४
प्रचि०३-ब - चंद्रग्रहण २०२१
सूर्यग्रहणाच वेड लहानपणीच लागल होत. साल होत १९८०, खग्रास सूर्यग्रहण होत पण त्यावेळी अगदी लहान होतो मी, दुर्दैवाने सगळे दार खिडक्या लावून घरात दूरदर्शन वर बघत होते. अगदी तेंव्हां सुध्दा ते ग्रहण बघायची हौस होती पण तस झालं नाही. पुन्हा १९९५ मधे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसलं होत पण ते उत्तर भारतातून दिसलं, आमच्या कडे मुंबईत खंडग्रास दिसलं होत. खंडग्रास सूर्यग्रहण बघण्याचा योग पुन्हा २-३ वेळा आला होता. ते दृश्य बघताना खरोखरच कुणीतरी सूर्याचा घास घेतला की काय वाटलं.
प्रचि०४ - सूर्यग्रहण २०१२ सॅन फ्रान्सिस्को
२०२१ च्या शेवटी अमेरिकेतून दिसणाऱ्या सूर्यग्रहणा बद्दल चा लेख वाचनात आला. तेंव्हाच ठरवलं की ही संधी सोडायची नाही. सुदैवाने सौ. आणि मुलाचा ही उत्साह होता. २०२३ मधे कंकणाकृती सूर्यग्रहण होत तर २०२४ मधे खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. दोन्ही ग्रहण खंडग्रास स्वरूपात कॅलिोर्नियातून दिसणार आहेत पण आता आम्हाला मात्र कंकणाकृती आणि खग्रासच बघायचं होत.
ह्या दोन्ही प्रकारच्या ग्रहणाची खासियत आहे. खग्रास सूर्यग्रहणात काही वेळा पुरता संपूर्ण सूर्य झाकला गेल्याने रात्री सारखा अंधार पसरतो आणि दिवसा तारे दिसतात (खरोखरीच .... शाळेत उचापती केल्यावर शिक्षकांनी दाखवले होते तस नाही). रात्रीच आकाश आणि खग्रास सूर्यग्रहणात दिसणार आकाश ह्यात खगोलशास्त्रीय फरक आहे. पण ते राहू दे, हे दृश्य खरोखरच विलोभनीय असतं.
कंकणाकृती ग्रहणात असा अंधकार होत नाही, पण चंद्र बिंब सूर्या पेक्षा थोड म्हणजे काकण भर लहान असतं त्यामूळे सूर्य संपूर्ण झाकला जात नाही तर त्याच्या मधोमध आल्यावर बाजूने एक सुंदर कड दिसत म्हणुन आपण त्याला कंकणाकृती म्हणतो तर इथे त्या अवस्थेला Ring of fire म्हणतात.
तर असा कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्याचा योग गेल्या शनिवारी पितृ अमवस्येला आला. आमच्या इथुन खंडग्रास स्वरूपात दिसणार होत पण शेजारच्या नेवाडा स्टेट मधून मात्र काही ठिकाणी कंकणाकृती दिसणार होत. जवळपास ५०० मैल (८०० की.मी.) - ८ तासाचा प्रवास होता. तिथं जायला विमानाची सोय होण्या सारखी नव्हती. मग काय ठरलं,... जायचं ड्राईव्ह करून. ह्यापूर्वी ४ तासाच ड्राईव्ह करून Reno ला दोनदा गेलो होतो, तिथून अजून ४ तासावर Elko ला जायचं होत. महिनाभरा पूर्वी हॉटेल बुक केलं. अजून एक मित्र येणारं होता बरोबर, पण एन वेळी नाही जमल त्यांना. शुक्रवारी आम्ही दोघांनी रजा घेतली, सुदैवाने मुलाला Teachers training day मुळे सुट्टी होती. सकाळी १० ला ब्रेकफास्ट घेऊन घरून निघालो. घरापासून Reno पर्यंत रस्ता ओळखीचा आहे. हिवाळ्यात बर्फात खेळायला Lake Tahoe, Reno पर्यंत एखादी ट्रीप होतेच दरवर्षी. हिवाळ्यात बर्फाने आच्छादलेले सियारा चे पर्वत आता वेगळ्या रूपात दिसत होते पण आम्हाला त्यात काही फार रोचक वाटत नव्हतं, Elko ला संध्यााळपर्यंत पोहचायच होत. ठरल्या प्रमाणे Reno ला २ पर्यंत पोहचलो. पटकन cholipotle (मेक्सिकन फूड) मधे जेवण आटपून निघालो. Reno च्या पुढे रस्ता नवीन असला तरी कठीण नव्हता. पण इथला भूप्रदेश वेगळा आहे, आमच्या साठी हे नवीन होत, नजर जाई तोवर पसरलेले जणू वाळवंट, आजूबाजूला डोंगर आहेत पण ते ही उजाड किंवा खुरटी झुडप असलेले आणि लांबलचक सरळ जाणारा intarstate 80 (राष्ट्रीय महामार्ग).
प्रचि०५ - नेवाडा - हि वाट दूर जाते
प्रचि०६ - नेवाडा
प्रचि०७ - नेवाडा
संध्याकाळ व्हायच्या आधीच अंधार वाटू लागला, वर पाहिलं तर ढग भरपूर जमले होते. Weather app वर शनिवारची सकाळ ४५% टक्के ढगाळ असणार Elko ला अस सांगत होती. थोडीशी धागाधुग मनात ठेवून पुढे गेलो आणि संध्यकाळी वेळेवर पोहचलो हॉटेल वर.
शनिवारी सकाळी ६.५० ला सूर्योदय आणि ८.०५ ला ग्रहण स्पर्श होणार होता. सकाळी ६.०० ला उठून बाहेर बघितलं, आभाळ संपूर्ण भरलं होत, बाहेर काहीं लोक आपले कॅमेरा, दुर्बिणी वैगरे घेऊन जमले होते. मी खाली गेलो , पार्किंग मध्ये, आजूबाजूचा परिसर मोकळा होता त्यामुळे ग्रहण बघायला काहीच अडचण नव्हती. पण तिथून पूर्व क्षितजाकडच्या डोंगरावर अगदी काळे ढग जमलेले दिसत होते. ते विरळ होण्याची किंवा हलण्याची शक्यताही कमी होती कारण तेवढा वाराही सुटला नव्हता. सूर्योदय होऊन ३० मिनिट झाली पण काही फार बदल वाटत नव्हता.
प्रचि०८ - ढगाळलेल पूर्व क्षितिज
आता दुसऱ्या ठिकाणी जाण्यात अर्थ नव्हता, आणि आजूबाजच्या जवळच्या गावातही ह्या पेक्षा ही जास्त ढगाळ आणि पावसाची शक्यता वर्तवली होती. एवढा प्रवास करून ही संधी जाणार म्हणून मन उदास झाल. परत रूम वर आलो, सौ. ने छान ब्रेकफास्ट तयार केला होता (महिनाभर आधी बुकिंग करूनही ३ स्टार हॉटेल मिळालं नाही). खिडकीतून बाहेर पाहिलं तर पश्चिमेला डोंगरावर उन पडलं होत, म्हणजे थोड उघडण्याची शक्यता होती. पुन्हा खाली आलो, तोवर ८.१५ झाले होते आणि चमत्कार झाला, सूर्य बऱ्या पैकी वर येऊन ढगांमधून डोकावून दर्शन देत होता. आणि शेवटी एकदाचा पूर्व कडील आकाशाचा भाग बऱ्या पैकी मोकळा झाला. लगेच फोन करून सौ. आणि मुलाला खाली बोलावलं, त्यांनाही आनंद झाला, मग तिघेही solar eclipse glasses (सूर्यग्रहण बघण्यासाठीचे चष्मे ) घालून सुस्सज झालो. Tripod वर कॅमेरा सेट करून मी आधीपासूनच तयार होतो. मागे खुर्ची टाकून कधी चष्म्यातून तर कधी कॅमेऱ्याच्या viewfinder मधून मी बघत होतो, अर्थात कॅमेऱ्याच्या लेन्स ला ही फिल्टर लावला होता. ( सूर्यग्रहण बघण्यासाठीचे चष्मे किंवा विशिष्ट फिल्टर लेन्स लावल्या शिवाय सूर्या कडे ग्रहणात बघणं अतिशय धोकदायक असतं, नेहमीचे गॉगल वापरणही चुकीचं आहे). ४०० ते ६०० मीमी लेन्स मधून ते नारंगी सूर्याला झाकत जाणार चंद्र बिंब अतिशय मनोहर होत, खरच आजुबाजूच भान विसरून बघावं अस दृश्य होत. सूर्य आणि चंद्र जसे आकाशात वर सरकत होते तस कॅमेरा आणि ट्रायपॉड adjust करत ठराविक वेळाने फोटो घेत होतो. वेळ कसा जात होता काळात नव्हतं आणि मग तो क्षण आला, चंद्रबिंब संपूर्णतः सूर्य गोलाच्या आत होत आणि बाजूने ते नारंगी तेजस्वी कड दिसत होत. ते दृश्य माझ्या आठवणीत आणि कॅमेरात साठवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो. लगेचच काही मिनिटात चांद्रबिंब हळूच खाली सरकले. माझा मुलगा लगेच म्हणाला "hey baba this looks like googly eye", खरच ते ही गोड दृश्य होत. आता हळूहळू ग्रहण समाप्ती कडे जात होत. आणि पुन्हा एकदा आभाळ ढगांनी भरायला लागलं. संपूर्ण ग्रहण सुटाण्या आधीच ढगांचा पडदा पडला होता. खरच निसर्गाने कृपा केली आणि ही कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्याची almost once in life time संधी सफल झाली. त्या मनातल्या स्मृती आणि कॅमेरातले फोटो जपून सगळं आवरलं आणि पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
प्रचि०९ - सूर्यग्रहण २०२३ एल्को नेवाडा
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाची किमया भुरळ घालतेच पण मागच्या वर्षी अजून एक वेगळं ग्रहण पाहायला मिळालं --- मंगळ ग्रहण. खर तर खगोलशास्त्रिय भाषेत त्याला पिधान (युती) म्हणतात. जेंव्हा दोन ग्रह किंवा ग्रह आणि चंद्र (किंवा सूर्य) आकाशात एकमेकांच्या अगदी जवळ दिसतात तेंव्हां ती युती असते, पण काही वेळा हे ग्रह एकमेकांना ओलांडून जाताना भासतात, जेंव्हा चंद्रा बरोबर अशी पिधान (युती) होते तेंव्हा काही काळा साठी तो ग्रह चंद्रा मागे दडला जातो. एकाबाजूने येऊन दुसरी कडून बाहेर येणारा ग्रह हे पाहणं अतिशय विलोभनीय असतं. यावर्षी असा चंद्र मंगळ योग झाला होता, तेंव्हां माझी फोटग्राफी सामुग्री एवढी सुस्सज नव्हती, तरीही ३०० मिमी लेन्स ने काढलेले हे काही फोटो. पौर्णिमेचा लखलखीत चांदोबा आणि त्याच्या बाजुला पिटूकला मंगळ, दोघांना एकाच फ्रेम मध्ये फोकस करून exposure balance करताना थोड कठीण जात होत.
प्रचि१० - मंगळ ग्रहण २०२२ Fremont
खूप सुंदर !
खूप सुंदर !
छान लेख. फोटो सुंदर आहेत.
छान लेख. फोटो सुंदर आहेत.
धन्यवाद @कुमार, @सोनाली
धन्यवाद @कुमार, @सोनाली
सुरेख आहेत सगळे फोटो.
सुरेख आहेत सगळे फोटो. माहितीही छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो आणि लेख!
छान फोटो आणि लेख!
मन्या, मस्त वाटलं वाचून. फोटो
मन्या, मस्त वाटलं वाचून. फोटो तर अप्रतिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही कर्व्हील टेक्सस जवळ येत होतो, आम्हाला व्यवस्थित दिसलं ग्रहण. नासाच्या ग्रूपने कर्व्हील जवळ तंबू ठोकून यूट्यूबवर संपूर्ण प्रक्षेपण दाखवलं. आमच्याकडे चष्मेही वाटले होते. बाहेर डोळे खराब व्हायचे म्हणून मी (भाच्यांसाठी) टिव्हीवरच्या ग्रहणाचा फोटो काढला.
अरे काय कातिल फोटो आहेत...
अरे काय कातिल फोटो आहेत...
लेख वाचतो आरामात...
@वावे प्रतिक्रिये बद्दल
@वावे प्रतिक्रिये बद्दल ध्यवाद
@अस्मिता - धन्यवाद, एप्रिल मधे टेक्सास ला जाईन.
@धन्यवाद ऋन्मेष
सगळे फोटो छान
सगळे फोटो छान
मला शनीचा फोटो सगळ्यात जास्त आवडला
मस्तच सगळे फोटो, लेख पण छान
मस्तच सगळे फोटो, लेख पण छान
@कविन, @निर्मळ धन्यवाद
@कविन, @निर्मल धन्यवाद
@मध्यलोक - मलाही तो शनी चा फोटो आवडलाय, त्यामानाने बऱ्याच स्वस्तातल लेन्स वापरूनही शनीच कड टिपता आल.
छान लेख आणि फोटो.
छान लेख आणि फोटो.
छान लेख आणि फोटो.
छान लेख आणि फोटो.
छान फोटो आणि लेख..!!
छान फोटो आणि लेख..!!
ढगाळलेलं आकाश मोकळं झालं ते बरं झालं..
एवढ्या प्रवासाचं, नियोजनाचं, मेहेनतीचं आणि आशेचं चीज झालं..
फारच सुंदर फोटो सर्व
फारच सुंदर फोटो सर्व
आवडीसाठी / छंदासाठी दूर प्रवास करून फोटो काढणे आणि शेअर करणे फारच आवडले
वा, खुप छान ग्रहण, युती
वा, खुप छान ग्रहण, युती दर्शन घडवलत. सुंदर.
@उपाशी बोका - धन्यवाद
@उपाशी बोका - धन्यवाद
@मानव - धन्यवाद
@अनिरुद्ध, @झकासराव - धन्यवाद, नेहमीच्या जीवनात काहीतरी बदल म्हणून थोडासा फोटोग्राफीचा छंद जोपासतो, इथे भरपूर लेख वाचायला मिळतात आणि त्यातून टिप्स मिळतात.
@वावे @मार्गी ह्यांचे विशेष आभार त्यासाठी.
असे क्षण कॅमेरात घ्यायासाठी खरच निसर्गाची पण कृपादृष्टी असावी लागते
फारच सुंदर !!
फारच सुंदर !!