नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
रोज सकाळी नुसतं उठायचा सुद्धा कंटाळा करणारी मी, प्रवासाला जायचं म्हंटल्यावर, ट्रेकला जायचं म्हंटल्यावर अगदी पहाटे चारला सुद्धा खुशीनं जागी होते. पहाटे पाचपासून संध्याकाळी पाचपर्यंत सुद्धा आनंदानी गाडी चालवते. तो आनंद खरंतर ठराविक ठिकाणी पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासाचा असतो, त्या गाडी चालवण्याचा असतो. असं वाटतं फक्त पुढे पुढे जात राहावं, डेस्टिनेशन पन्नास किलोमीटरच्या आत आलं असं दाखवणारा माइलस्टोन मला वाकुल्या दाखवणाऱ्या लहान मुलासारखा वाटतो. खासकरून तेव्हा, जेव्हा पुणे पन्नास किलोमीटर चा बोर्ड दिसतो. अगदी लहान असल्यापासूनचा हाच अनुभव आहे.