ॐ नमोजी आद्या : प्रिया पाळंदे
उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिंचा नायक, सुखदायक भक्तांसी
उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिंचा नायक, सुखदायक भक्तांसी
दोन विरुद्ध गोष्टी अनेकविध स्वरुपात आपल्यासमोर येतात. कधी त्या एकमेकांबरोबर खुलून दिसतात, एकमेकांचे सौंदर्य वाढवतात. कधी हूरहूर लावून जातात, कधी निराशेतून आशा दाखवतात, एक नवा दृष्टीकोन देतात. केवढी ही लोभस रुपं!!!
दोन विरुद्ध गोष्टींची ही जुगलबंदी टिपायला एक कॅमेरा आणि टिपणारी नजर असेल तर मग क्या बात हैं!!! चला तर मंडळी, या अदाकारी 'काँट्रास्ट' ला कॅमेर्यात पकडायचा प्रयत्न करुया.
प्रकाशचित्रे स्पर्धा क्र. १ : विरुद्ध
सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:
मायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.
ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.
ग्लोबल वॉर्मिंग, रिसायकल - रिड्युस - रियुज, कॉम्पोस्टींग हे शब्द सतत कानावर पडतात. आपण नक्की काय करावे हे समजत नाही. काहीतरी करावेसे मात्र वाटते. नुसते हातावर हात ठेवून बसून चालणार नाही असे वाटते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक नवीन संकल्प सोडूया की जे जे शक्य आहे ते ते सर्व मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुनःपुन्हा वापरणार. म्हणूनच -
गेल्या ४ वर्षातल्या कित्येक ड्रेसेसच्या बाह्या पिशवीत पडून आहेत?
गेल्या कित्येक वर्षांत आलेल्या पत्रिका, भेटकार्डं साठवून ठेवलीत?
आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.
मायबोलीच्या गणेशोत्सवाची जशी मोठे मायबोलीकर वाट बघत असतात तशीच आपली छोटी दोस्तमंडळी म्हणजेच भावी मायबोलीकरही वाट बघत असतात. अहो का म्हणून काय विचारताय? हीच तर वेळ असते ना त्यांना आपले कलागुण जगाच्या कानाकोपर्यापर्यंत दाखवायची. अर्थात मायबोली ही ह्या बच्चेकंपनीला कधी निराश करत नाही. आबालवृद्धांपासूनच सगळेच उत्साहाने सर्व स्पर्धा, कार्यक्रमात सहभागी होतात.
मग तो मानसिक असो, शारीरिक असो किंवा आर्थिक असो...आधार देण्याच्या मनात दाटलेली अपार कणव आणि तो स्वीकारणार्याच्या डोळ्यात साठलेली कृतज्ञता. असेच काही क्षण टिपूया या भागात.
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३ : 'आधार'
*****************************************************
स्पर्धेचे नियम :
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात'
*****************************************************
स्पर्धेचे नियम :
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेर्याच्या सेटींगचे तपशील (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.