प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : 'एक नवीन सुरुवात'
*****************************************************
स्पर्धेचे नियम :
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेर्याच्या सेटींगचे तपशील (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.
५. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.
६. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल इतकी हवी.
७. छायाचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता मायबोली गणेशोत्सव २०१० असा लोगो टाकावा.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Ek Navin Suruwat असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेलमध्ये छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा. छायाचित्राला शीर्षक असेल तर चालेल, बंधनकारक नाही.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेलद्वारे कळवावे.
प्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशी पर्यंत स्वीकारल्या जातील.
या विषयासंदर्भात कोणाला काही
या विषयासंदर्भात कोणाला काही शंका असतील तर संयोजकांना इथेच नक्की विचारा.
धन्यवाद संयोजक स्पर्धेचा
धन्यवाद संयोजक
स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल.>>>>यावेळेस माबोकरांचे वोटिंग नाही का?
योग्या.. तुला त्याची चिंता
योग्या.. तुला त्याची चिंता नको तू फक्त प्रकाशचित्राच्या थिमनुसार चित्र पाठव. बाकी तथास्तू.. म्हणणारे परीक्षकच तुला भेटतील.
प्रकाशचित्राचा तिन्ही थिम आवडल्या.. त्यातल्या त्या कॉन्ट्रास्ट थिम सर्वात जास्त आवडली. भारतात अश्या विषयावर खूप प्रकाशचित्रे पहायला मिळतील.
योग्या.. तुला त्याची चिंता
योग्या.. तुला त्याची चिंता नको तू फक्त प्रकाशचित्राच्या थिमनुसार चित्र पाठव. >>>
अरे वा... विषय मस्त आहे....
अरे वा... विषय मस्त आहे....
संयोजकजी, एक विनंती (जर शक्य
संयोजकजी, एक विनंती (जर शक्य असेल तरच)
संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल अशी हवी.>>>>>जर स्पर्धेचे सगळे फोटो पिकासा वा तत्सम साईटवर अपलोड करून त्याची लिंक स्पर्धेच्या त्या त्या विभागात दिली तर बरे होईल. यामुळे मूळ छायाचित्राची क्वालिटी चांगली राहिल आणि माबोकरांना थोड्या मोठ्या आकारात प्रचि पाहता येतील.
२००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ फोटोच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असे माझे मत.
स्पर्धकाने फोटो (जास्तीत जास्त १ किंवा २ एमबी पर्यंत) तुम्हाला इ-मेलने पाठवावे आणि तुम्ही सगळे फोटो पिकासा वा तत्सम साईटवर अपलोड करून त्याची लिंक द्यावी. हे जर शक्य असेल तर नक्कीच याचा विचार करावा.
२००केबी पेक्षा कमी साईज
२००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ फोटोच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असे माझे मत. >> माझेही तेच मत..
हा ही विषय छान.
हा ही विषय छान.
योगेश म्हणतोय ते अगदी खरं
योगेश म्हणतोय ते अगदी खरं आहे. पिकासावरून अपलोड केल्या जाणार्या प्रकाशचित्रांवर बंधन नसावे.
प्रवेशिका स्विकारण्यास गणेश
प्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीपासून (११ सप्टेंबर) सुरुवात होईल व प्रवेशिका अनंत चतुर्दशीपर्यंत (२२ सप्टेंबर) स्वीकारल्या जातील. दिलेल्या तारखेआधी व तारखेनंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. कृपया नोंद घ्यावी.
योगेश२४ यांनी विचारलेल्या
योगेश२४ यांनी विचारलेल्या शंकेचे हे उत्तर :
बर्याचदा असं होतं की कालांतराने पिकासा अथवा अन्य साईटवरून छायाचित्रं काढली जातात व अशी लिंक दिली असल्यास जिथे ती लिंक दिली गेली आहे तिथेही ते फोटो दिसेनासे होतात. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने यावर वरील निर्णय घेतला आहे. तसंच २००केबी पेक्षा कमी साईज करताना मूळ छायाचित्राच्या क्वालिटीला थोडा धक्का लागेल असं तुम्हांला वाटतंय नां, मग जर तुम्ही फोटोशॉप वापरत असाल तर तिथे 'सेव्ह फॉर वेब' नावाचा एक पर्याय आहे. त्यामुळे छायाचित्राचे आकारमान खूप कमी होते परंतु वेबपेजवर छायाचित्र चांगले दिसते. तसंच पिकासामध्येही 'एक्सपोर्ट' हा पर्याय निवडून छायाचित्रांचे पिक्सेल्स कमी करता येतील (मूळ क्वालिटीला धक्का न लागता).
तुमच्या सुचनेबद्दल आभारी आहोत.
धन्यवाद संयोजक, मी
धन्यवाद संयोजक,
मी फोटोशॉपमध्ये चेक करून बघतो
अरे, अजुन कोणाची काही नविन
अरे, अजुन कोणाची काही नविन सुरुवात झालेली दिसत नाहीये!
सावली इथे बघता येतील आलेल्या
सावली इथे बघता येतील आलेल्या प्रवेशिका - http://www.maayboli.com/node/19766
ओक्के.
ओक्के.
गणेशोत्सव २०१० अंतर्गत
गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.