हास्य लहरी - क्लीन चिट - चैतन्य रासकर
"आय चिटेड ऑन निखिल" केतकी म्हणाली.
"व्हॉट?"
"आर यू मॅड??"
"सॉरी..."
"सॉरी काय? अगं तुझ्या लग्नाला दोनच आठवडे राहिलेत" मेघा केतकीवर ओरडली.
हे ऐकून नंदन सटकन शिंकला!! शिंकेचे कण असे भोवताली विसावले, वातावरण शिंकामय झालं.
"शी.. का?" मेघा नंदनवर ओरडली.
"सॉरी... काही शॉकिंग ऐकलं की मला शिंका येतात" नंदन नाक पुसत म्हणाला.
"तुझ्या शिंकासुद्धा शॉकिंग आहेत" मेघा नंदनला रुमाल देत म्हणाली.
हे सगळं बघत, केतकी डिश मधल्या सॉसमध्ये बोट घालून, विचार करू लागली.