मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??
परमात्म्याला जाणून घेणे, हेच मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. यस्तन्न वेद किमृचा करिष्यति l असे ऋग्वेदात म्हटले आहे, म्हण़जे जो परमात्म्याला जाणत नाही, तो (फक्त) ऋचा जाणून काय करणार ?
सृष्टीच्या आरंभापासून माणूस, आत्मा-परमात्म्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या रहस्याची उकल करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न तो पूर्वीपासून करत आला आहे.
हिंदू धर्मात प्रामुख्याने पाच संप्रदाय आढळतात. सौर, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव.
‘ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण… ढडाढाण…टडाढाण…
ढडाढाण…टडाढाण… ढाण्ण !!!’
ढोलाचा असा आवाज कानात रूंजी घालू लागला की जाणवतं, आता गणपती येणार मन आठवणींच्या राज्यात रमतं.
फ्लॅश बॅक – पुणे
प्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे.