खव्याचे मोदक
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
14
आज (दिनांक ४ सप्टें. ) खव्याचे मोदक (रिकोटा चीज पासून)
गणपतीत खव्याच्या मोदकांशिवाय उत्सवी वाटत नाही म्हणून मी भारतातून लहान मोदकांचा साचा आणलाय. मोदक छान झालेत पण अजून थोडे नरम आहेत, वाळले की कडक व्हावेत.
गणपती बाप्पा मोरया!
विषय:
प्रकार:
शेअर करा
पिवळा रंग
पिवळा रंग कसा काय आला उपास.. छान दिसत आहेत, चव छान असेलचं
सहीच.
सहीच. तुझ्या ह्या फोटोमुळे मला आता कॉम्प्लेक्स यायला लागलाय त्यावर काय उपाय करावा बरं!!!!
मस्तच!!
मस्तच!!
काय सुबक
काय सुबक दिस्ताहेत! कसे केलेस?
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना. 'तो' करवून घेतोय सेवा म्हणून होतय..
वैदेही च्या साईट वरून पेढ्यांची रेसिपी पाहिली आणि मोदक करण्याच डोक्यात आलं.
साचा आणलाय मुंबईवरून त्यामु़ळे सुबक झालेत आणि रंग घातला खाण्याचा, कारण पिवळ्या मोदकांशिवाय मजा नाही.
वैदेही ची पेढ्यांची रेसिपी : http://chakali.blogspot.com/2007/10/pedhe.html
जवळ जवळ दोन अडीच तास लागले (बरेच केलेत म्हणून नाहीतर तासाभरात होतील) , गरम असताना साच्यातून काढले तर पटापट होतात तयार.
गणपती बाप्पा मोरया!!
उपास, नुसता
उपास,
नुसता फोटो काय टाकतोस कृती पण टाक ना. मस्त दिसताहेत एकदम फोटोत, करुन बघेन तू कृती टाकली की.
अगं रुणी,
अगं रुणी, टाकलेय कृती. वैदेहीच्या ब्लॉगची लिंक आहे तीच कृती. मी केलेले बदल सुद्धा लिहिलेत वरती.. काही अडलं तर नक्की विचार..
मस्तच!
मस्तच!
उपास ... का
उपास ... का त्रास देतो बाबा ?
मस्तच दिसतायत मोदक.
उपास, तुझा
उपास, तुझा मोदकाचा उत्साह पाहून स्वतःची अगदी लाज वाटली. आता विकेंडला करुन बघावेत म्हणते.
उपास,अरे
उपास,अरे वा! खव्याचे मोदक. प्रसादात एक मोदक नी खोबरे इतके मस्त लागते ना.
अस काय
अस काय म्हणतेस सायो. मी केले काय अन तू केलेस काय, आणि साचा नसेल तर मोदक करण कठीण आहे हे, पण नुसते पेढे वळता येतीलच.
अरे करणार
अरे करणार आहे आज. वैदेहीची रेसिपी प्रिंट करुन ठेवलीये. बघुया कसे जमतायत ते. माझ्याकडचा साचा काही सापडत नाहीये त्यामुळे मला जरा टेंशनच आलंय.
उपास कसा
उपास कसा आहेस? शिकागोतच असतोस का?