भिंत
भिंत
घर प्रत्येकाचं . घराच्या भिंती आपल्या . भिंतींशी ओळख, भिंतींशी जवळीक आणि रोजची सुरू असलेले व्यवहार .आपल्या घराच्या भिंती आपल्या किती जवळच्या असतात . त्या चार भिंतीच्या आत स्वतःला सुरक्षित ठेवून , स्वतःला झोकून देऊन आपण आत गुंततो . भिंतीला कधी जवळून आत्मीयतेने बघणे वगैरे आपण काही करत नाही . भिंतीचे निरीक्षण भिंतीचा आपलेपणा वगैरे साठी आपल्याला निवांत वेळच नसतो मुळी . पण आपल्याला सर्वात सुरक्षित वाटतं असलेली जागा कुठली आहे तर आपलं घर . घराच्या भिंती भिंतीला असलेले दार दारावरची कडी , कडी लावून अडकवलेले कुलूप आणि किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवून आपण निर्धास्त असतो .