काय करणार माझ्या चांगल्या आणि वाईट आठवणीनां साठवून जेव्हा मीच या जगात नसणार! कारण अस म्हणतात की मृत्यु हे जगातलं एकमेव सत्य आहे आणी ते तर एक दिवस सगळयांच्याच गळा भेटेल.
काय करणार पुन्हा तेच क्षण जगायची आस ठेऊन जेव्हा मीच त्या क्षणांमध्ये नसणार!
काय करणार ते गोड भारी स्टेटस ठेऊन ,जेव्हा मीच ते बघायला नसणार !
काय करणार त्या निर्जीव फोटो ला तुमचे अनमोल अश्रु दाखवुन तेव्हा मीच ते अश्रु वाटायला या जगात नसणार ,
हातांना कधी पंख मह्वणाव
शब्दांची वाट तर मिळाली पण
चालतांना थोडी खळबळ उडाली
म्हटलं शब्दांशी थोड खेळुन बघाव
कवितांना जरा मोकळ्यात ओढांव!
वारा होउन झाडांशी खेळावं
नदी होऊन समुद्रास मिळावं
पक्षांच सुंदर ते गीत व्हाव
निसर्ग बनून मजेत जगावं !
पाउस होउन बेधुंद पडाव
दुर शिंपल्यांना ओढून न्याव
हातांना कधी पंख म्हणाव
दूर कुठून उडून यावं !
उडता उडता मध्येच थांबाव
सुंदर नितळ ते पाणी बघाव
घेऊन भरारी चंद्रावर जावं
तुटल्यावर चांदणी बसून याव!....
नविन जरी आहे मी
आहे खुप चाणाक्ष
कोण काय करतो
आहे माझं लक्ष
हरवलेला किनारा…….. (भाग १) http://www.maayboli.com/node/54496
मग २-३ दिवसांनी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा होती . त्याच दिवशी समीरने आकांक्षाला विचारायचं ठरवलं . म्हणून तो त्या दिवशी संधी शोधत होता . समीर कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरती एक मित्राशी बोलत उभा होता तेवढ्यात ,
"समीर-अजय चला खाली देवाच्या पाया पडायला इथे काय बोलत उभे राहिलात" एका सिनिअर madam त्यांना सांगून निघून गेल्या, पण समीरला खाली जायचा कंटाळा आला होता,
"चल कोण जातंय खाली मला खूप कंटाळा आलाय आता!! नंतर जाऊया", असं म्हणून तो पुन्हा मित्राशी बोलत तिथेच रेंगाळला .
wow !! अक्षु किती मस्त प्लेस आहे ना गोवा !!
I’m so exited यार आपण खूप धमाल करायची हा, इथले सगळे बीच पालथे घालायचे " गोव्याला येउन प्रिया खूप उस्ताहित झाली होती .
आज खूप दिवसांनी आकांक्षाहि बाहेर पडली होती रोजच्या कामातून तिला कधी वेळच मिळत नसे. आणि स्वप्नीललाही मनात असूनसुद्धा तिला वेळ देत येत नसे. याही वेळी त्याला जमल नाही म्हणून त्याने तिला प्रीयाबरोबर बाहेर पिकनिकला जायला सांगितला होतं , कारण त्याला कामानिमित्त ४-५ दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागणार होतं . हो-नाही करता -करता आकांक्षाही तयार झाली . आणि ती प्रियाबरोबर गोव्याला आली .