काय करणार माझ्या चांगल्या आणि वाईट आठवणीनां साठवून जेव्हा मीच या जगात नसणार! कारण अस म्हणतात की मृत्यु हे जगातलं एकमेव सत्य आहे आणी ते तर एक दिवस सगळयांच्याच गळा भेटेल.
काय करणार पुन्हा तेच क्षण जगायची आस ठेऊन जेव्हा मीच त्या क्षणांमध्ये नसणार!
काय करणार ते गोड भारी स्टेटस ठेऊन ,जेव्हा मीच ते बघायला नसणार !
काय करणार त्या निर्जीव फोटो ला तुमचे अनमोल अश्रु दाखवुन तेव्हा मीच ते अश्रु वाटायला या जगात नसणार ,
त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत आपल्या माणसांशी मनमोकळा बोला, त्यांची काळजी घ्या, त्यांच्या आवडी निवडी जपा,घडुन गेलेल्या गोष्टीत दुःखी होण्यापेक्षा त्या आठवणीनां आनंदाने जगा,कुणाच्या फोटोशी बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत हसायला शिका,ज्याने हे केलं समजा त्याने जग जिंकल!
जिवंत नसतांना आपल्या काही ईच्छा तशाच मनामध्ये राहुन जातात त्यामुळे जिवंत असतांना त्या सगळ्या ईच्छा पुर्ण करायचा प्रयत्न करा कारण मरणानंतर बाकी तुमच्या अपूर्ण ईच्छा नाही तर कुणासोबतच्या गोड आठवणी या जगात राहील्या पाहीजे आणि तेव्हा पुन्हा तुम्ही नसल्यावर सुद्धा तुम्ही आठवणींमध्ये जिवंत असाल !
काय करणार
Submitted by Santosh zond on 13 August, 2020 - 06:45
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा